Accident : खुलताबाद – फुलंब्री रोडवरील तिहेरी अपघातात एक ठार तर दोघे जखमी | पुढारी

Accident : खुलताबाद - फुलंब्री रोडवरील तिहेरी अपघातात एक ठार तर दोघे जखमी

औरंगाबाद; पुढारी ऑनलाईन : खुलताबाद – फुलंब्री रोडवरील विरमगाव फाट्या जवळ सोमवारी (दि. ५) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चारचाकीने ( क्र. एमएच ०४ सीटी ३७१८) दुचाकीस्वारास समोरून जोराची धडक दिली, या अपघतात (Accident) कारने दुसऱ्याही दुचाकीस ओढत नेले. या तिहेरी अपघातात एक जण गंभीर तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

या अपघातात (Accident) अभिषेक प्रभाकर घुले (वय १९) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर कृष्णा नवनाथ घुले (रा. भांडेगाव) आणि रमेश ज्ञानेश्वर चव्हाण (रा. सुलतानपूर) हे जखमी झाले आहेत.

अपघातामध्ये (Accident) अभिषेक प्रभाकर घुले हा दुचाकीस्वार गंभीर रित्या जखमी झाला होता. अपघातानंतर तातडीने जखमींना औरंगाबादच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान अभिषक घुले याचा सायंकाळी ६ च्या दरम्यान मृत्यू झाला.

अपघात घडताच घटना स्थळांवर कार सोडून कार चालक फरार झाला आहे. खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुजंगराव हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक चेळेकर यांनी घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात केला आहे.पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल घोडके करत आहे.

Back to top button