ठाणे : आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ‘कांताचा’ पुढाकार; बोटीचे करते सारथ्य

आदिवासी
आदिवासी
Published on
Updated on

ठाणे ; पुढारी वृत्‍तसेवा मंत्रालया पासून 79 किमी अंतरावर, तर ठाणे जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 49 किमी अंतरावर भिवंडी वसई तालुक्याच्या सीमेवरील गणेशपुरी ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेलं ऊसगाव धरण आहे. या धरणाच्या नजीक पलाट हा आदिवासी पाडा आहे. जो आजही वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सोयींसुविधांपासून कोसो दूर आहेत. या आदिवासी पाड्यातील मुलांचे शिक्षण अडचणीत येऊ नये यासाठी याच पाण्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या कांता चिंतामण बरफ या मुलीने पुढाकार घेतला आहे. कांताने बोटीचे सारथ्य करत गेल्‍या दोन वर्षांपासून मुलांना शाळेत सोडणे आणि सायंकाळी शाळेतून घरी आणण्याचे काम करत आहे.

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील पलाट पाडा या गावाची पायाभूत सुविधांअभावी अत्यंत दुरावस्था आहे. या गावात शासनाची कोणतीही व्यवस्था नाही. उसगांव तलावाच्या किनाऱ्यावर असलेला हा पाडा अनेक समस्यांनी ग्रासला आहे. परंतु याच डॅम मधून दररोज वसई, विरार महानगरपालिकेला 20 एमएलटी पाणी पुरवठा करून तहान भागवली जाते. असे असताना या पाड्यावर नळ पाणी पुरवठा योजना नाही. ना वीज आहे, ना रस्ता त्यामुळे येथील जंगलातील कच्ची पायवाट पावसाळ्यात बंद होते. तेथील ओढ्याला सुद्धा पाणी वाढत असल्याने नावेतून प्रवास करून उसगावला या पलीकडे अर्धा तसांचा नावेतून प्रवास करून यावे लागते.

त्यामुळे या पाड्यावर असणाऱ्या 30 घरातील सुमारे 35 ते 40 विद्यार्थींना शिक्षणासाठी उसगाव अथवा वज्रेश्वरी येथे जाण्यासाठी नावेचाचं वापर करावा लागतो. परंतु घरातील व्यक्ती शेतावर कामावर गेल्याने नाव चालवायला कोणी नसते. त्‍यामुळे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची शाळा बुडत असे. अशीच कथा कांता हिच्या वाट्याला आली व त्यातच तिने या अडथळ्यांना कंटाळून इयत्‍ता नववीमध्येच आपली शाळा सोडली.

परंतु तिला आलेले नैराश्य शांत बसू देत नव्हते. त्यामुळे तिने मागील दोन वर्षांपासून आपल्या पाड्यातील लहानग्या मुलांची शाळा नाव चालवायला कोणी नाही म्हणून बुडू नये, यासाठी कांताने पुढाकार घेतला. या मुलांना दररोज शाळेत जाण्यासाठी व सायंकाळी घरी आणण्यासाठी तीने नावेचे सारथ्य करण्याचा निर्णय घेतला. त्यातून या मुलांचे शिक्षण अर्धवट राहणार नाही हा विश्वास कांता हिने व्यक्त केला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news