ठाणे : बँक फोडणाऱ्या टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले; 'रिंग राउंड' गुन्हे प्रतिबंधक गस्त पथकाची कारवाई | पुढारी

ठाणे : बँक फोडणाऱ्या टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले; 'रिंग राउंड' गुन्हे प्रतिबंधक गस्त पथकाची कारवाई

मुरबाड;पुढारी वृत्तसेवा: विद्यानगर (मुरबाड) येथील अॅक्सिस बँक एटीएम फोडून चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून रंगेहात पकडले. शनिवारी रात्रीच्या (दि.16) सुमारास ही घटना घडली. लोखंडी पार, ग्यास कटर, इतर साहित्य घेवून चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ही कारवाई केली. एटीएम फोडत असतानाच छापा टाकत, मुरबाड पोलिसांनी पकडल्याने मोठा अनर्थ टळला.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर,पो.हवालदार शेलार,पो. ना. कैलास पाटील, पोलीस शिपाई चालक भगवान बांगर, पो. हवालदार सुरवाडे, पोलीस कॉन्स्टेबल दिघे, खंडाळे यांनी केली आहे. मुरबाड पोलिसांच्या ह्या धाडसी आणि सतर्क कारवाईने त्यांचे कौतुक होत आहे. या करवाईने संपूर्ण मुरबाडकर जनतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या १० महिन्यांपासून मुरबाड पोलिसांच्या रिंग राउंड’ गुन्हे प्रतिबंधक गस्त पथकाने, रात्र अन् दिवस गस्त सुरू केली आहे. यामध्ये संध्याकाळी 12 वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत या पथकाकडून गस्त घालण्यात येते. यामध्ये आत्तापर्यंत या पथकाने मुरबाड येथील बँका, एटीएम, ज्वेलर्स, बाजारपेठ, संपूर्ण शहर, धार्मिक स्थळे, पुतळे, संभाव्य गुन्हे घडण्याच्या ठिकाणी गस्त घातली आहे. या भागात पोलिसांची दहशत निर्माण झाल्याने, या भागातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

हेही वाचा:

Back to top button