Nashik : सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कामगारांचे कुटुंबीयांसह आंदोलन | पुढारी

Nashik : सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कामगारांचे कुटुंबीयांसह आंदोलन

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

सातपूर औद्योगिक वसाहतीमधील सुप्रीम ऑटो सेल इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीमधील ५५ कामगारांनी कुटुंबीयांसह कंपनीच्या प्रवेशद्वारासह काम बंद आंदोलन करून कंपनी व्यवस्थापनाविरोधात घोषणाबाजी केली. कामगारांचा गेल्या नऊ महिन्यांपासून रखडलेला पगारवाढीच‌ा करार तसेच करारामध्ये नमूद केलेल्या बाबी व घटनांची अंमलबजावणी न करणे आदी मागण्यांसाठी सोमवारी (दि. ६) आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, कंपनी मालक पोलिस प्रशासनाच्या बळाचा वापर करून कामगार व कुटुंबातील सदस्यांना सातपूर पोलिस स्टेशनला घेऊन गेले. २५ मे रोजी कंपनी व्यवस्थापन व कामगार व युनियनचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती. यावेळी करार झाला होता. त्याची कंपनी व्यवस्थापनाकडून अंमलबजावणी होत नसल्या कारणाने गेटसमोर आंदोलन करण्यात आल्याचे कामगारांनी यावेळेस सांगितले होते. वरील ५५ कामगार सुप्रीम वर्कर्स युनियन सीटू संलग्न आहेत. या आंदोलनात सिंधु शार्दूल, कल्पना शिंदे, अण्णा त्रिभुवन, मोहन पाटील, महेंद्र ढोमसे, भाऊसाहेब पाटील, तात्या झाल्टे, संदीप सोमासे आदी उपस्थित होते. सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा :

 

Back to top button