सुभाष जगताप यांच्यावरील खोट्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा | पुढारी

सुभाष जगताप यांच्यावरील खोट्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

झोपडपट्टी मधील महिलांना शिधापत्रिका व रेशन धान्य बाबत जाब विचारण्यास गेलेले पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा अन्नधान्य वितरण समिती सदस्य सुभाष जगताप यांची अधिकाऱ्यांनी पोलिस तक्रार केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले.

सुभाष जगताप यांच्यावरील खोटी कारवाई न थांबवल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा माजी गृह मंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी यावेळी दिला. तसेच मातंग समाजाच्या संघटनाचे शिष्टमंडळ लवकरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शरद पवार व महविकास आघाडी च्या नेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले .

यावेळी दोषी अधिकारी यांच्यावर चौकशी समिती नेमून कारवाई करावी, सुभाष जगताप यांच्यावरील खोटी कारवाई तत्काळ थांबवण्यात यावी, कामचुकार आणि दप्तर दिरंगाई करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करावी आदी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

या आंदोलनामध्ये माजी मंत्री रमेश बागवे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले, माजी नगरसेवक अविनाश बागवे, निलेश वाघमारे सत्यशोधक बहुजन आघाडी चे संस्थापक सचिन बगाडे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हतागले , पुणे शहर मातंग समाज सचिव संजय केंदले, मातंग एकता आंदोलनाच्या महिला अध्यक्ष राजश्री ताई अडसूळ,गोविंद साठे यासह पुणे शहरातील विविध दलित, मातंग समाजाच्या संघटनेचे नेते, पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Back to top button