डोंबिवली : गोडाऊनमधील भरलेले गॅस सिलेंडर घेऊन २ एजन्सींमधील डिलिव्हरी बॉय फरार ! | पुढारी

डोंबिवली : गोडाऊनमधील भरलेले गॅस सिलेंडर घेऊन २ एजन्सींमधील डिलिव्हरी बॉय फरार !

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : सध्या वाढत्या गॅसच्या किमतीमुळे गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडून चोऱ्या होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. डोंबिवली येथील जयशक्ती आणि शिवशक्ती या गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून गॅस सिलेंडर चोरी झाले आहेत. यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमान बिष्णोई आणि श्रवण बिष्णोई या आरोपींवर गॅस एजन्सीचे मॅनेजर लखन सोनावणे यांनी गुन्हा दाखल केला आहे. 7 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास गोडाऊन मधील 25 भरलेले गॅस सिलेंडर भरून काम डिलिव्हरी करणाऱ्या हनुमान एकटा कोरेगाव भागात डिलिव्हरी करण्यासाठी सिलेंडर घेऊन गेला. तेथून दुपारी 2.45 वाजताच्या दरम्यान गाडी पार्क करून कोणास काही एक न सांगता निघून गेला.

त्यानंतर सदर गाडी फिर्यादी यांनी तपासली असता 9 भरलेले सिलेंडर कमी दिसून आले. ही गोष्ट लक्षात येताच हनुमान देशमुखच्या मोबाईलवर संपर्क साधला असता फोन बंद लागला. त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी गोडाऊनमधील नऊ सिलेंडर अपहार केला असल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे.

त्याच्याच बाजूला असणाऱ्या त्यांच्याच शिवशक्ती भारत गॅस गोडाऊन मधून 9 मे रोजी अशाच प्रकारे देसले पाडा येथे डिलिव्हरीसाठी एकूण 27 भरलेली सिलेंडर श्रवण कुमार वैष्णवी नावाचा डिलिव्हरी बॉय घेऊन गेला. त्यानंतर 27 रिकामी सिलेंडर गोडावून येथे जमा करून एका सिलेंडरचे प्रत्येकी 1000 रुपये असे एकूण 27 हजार आणि 295 रुपयाचे 1 रेग्युलेटर असे 27,हजार 295 रुपये रोख रक्कम पसार झाला आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button