डोंबिवली : लग्न झालेल्या प्रेयसीचे अश्लील फोटो टाकून बदनामी; प्रियकराला अटक | पुढारी

डोंबिवली : लग्न झालेल्या प्रेयसीचे अश्लील फोटो टाकून बदनामी; प्रियकराला अटक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर बनावट खाते काढून प्रेयसीचे अश्लील स्क्रीनशॉट फोटो व सदर फोटोचे व्हिडिओ बनवून प्रसारित करुन तिची बदनामी केल्याने प्रियकराला सापळा रचून अटक करण्यात आली. ही कारवाई गुजरात येथील बडोदरा येथे विष्णूनगर पोलिसांनी केली. कुंदन मित्री शहा (वय २४, रा. रिंकी चौकरी, नारायणनगर, हालोल, बडोदरा, राज्य गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी आणि कुंदन यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, कालांतराने फिर्यादी आणि कुंदनमध्ये काही बिनसल्याने तिने दुसऱ्या मुलाशी लग्न केले. याचा राग मनात धरून कुंदनने तिला बदमान करण्याचे ठरवून तिचे खोटे अकाउन्ट तयार केले. त्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींशी संपर्क साधून मोबाईलवर इन्स्टाग्रामवर तिचे अश्लील स्क्रीनशॉट फोटो व सदर फोटोचे व्हिडिओ बनवून प्रसारित करुन तिची बदनामी केली.

त्यानंतर फिर्यादीने या संदर्भात विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जयदिप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे, पोलीस नाईक पवार, पोलीस शिपाई के. ए. भामरे यांनी गुजरात येथील बडोदरा येथून सापळा रचून कुंदन याला अटक केली. अधिक तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button