डोंबिवली : एमआयडीसीने बांधलेले जलकुंभ असताना नागरिकांची पाण्यासाठी वणवण | पुढारी

डोंबिवली : एमआयडीसीने बांधलेले जलकुंभ असताना नागरिकांची पाण्यासाठी वणवण

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वणवण फिरावे लागत असताना दुसरीकडे मात्र करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या जलकुंभाचा वापरच होत नसल्याचे असल्याचे चित्र आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरात असणाऱ्या घरडा सर्कल जवळ 20 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ 1980 साली बांधण्यात आला होता. गेली कित्तेक वर्ष येथील रहिवाशी त्या जलकुंभ विषयी एमआयडीसीकडे विचारणा करीत आहेत. अनेकदा पत्रव्यवहार, माहिती अधिकाराद्वारे माहिती घेण्यात आली. पण, एमआयडीसीच्या भोंगळ प्रशासनाने यावर काहीच कृती केली नसून प्रशासन माहिती लपवण्याचे काम करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. इतकेच नव्हे तर जलकुंभ बांधण्यास किती खर्च आला आणि याचा वापर कधीपासून बंद करण्यात आला याची कोणतीही माहिती अधिकाऱ्यांकडे नाही.

संदीप देशपांडेचं ‘पलायन’; राज ठाकरे झाले ट्रोल

निवडणुकीची चाहूल : गायब झालेले नगरसेवक-इच्छुक उमेदवार पुन्हा प्रकटले

सदर जलकुंभ साठी 4850 चौरस मीटरचा हा भूखंड राखीव असून याच जागेवर नवीन जलकुंभ बांधण्याचे प्रस्तावित आहे, अशी फक्त उत्तरे देऊन वेळकाढूपणा चालला आहे. जर हा जलकुंभ त्यावेळीच वापरला असता किंवा दुरुस्ती करून अथवा त्याच जागेवर नवीन बांधला असता तरी येथील ग्रामीण भागातील पाणी टंचाई काही प्रमाणात कमी झाली असती.

याच जलकुंभाच्या भूखंडावर अनेकांची नजर असून मध्यवर्ती ठिकाणावर असलेला भूखंड कसा मिळवता येईल, असा काही विकासकांचा प्रयत्न चालू असल्याचे समजते.

डोंबिवली एमआयडीसी व ग्रामीण परिसरात अनधिकृत नळजोडण्या एकूण 1993 असून पाणी गळतीचे प्रमाण एकूण 14% असल्याचे स्वतः एमआयडीसीने माहिती अधिकारात डिसेंबर 2021 मध्ये दिले आहे. जरी हे अनधिकृत नळजोडण्या आणि पाणी गळतीचे प्रमाण कमी केले तरी बरीचशी पाणी टंचाई दूर होईल

– राजु नलावडे

हे वाचलंत का?

Back to top button