डोंबिवली : एकोणीस गुन्ह्यांत आरोपी असणारे तीन चाेरटे जेरबंद | पुढारी

डोंबिवली : एकोणीस गुन्ह्यांत आरोपी असणारे तीन चाेरटे जेरबंद

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : घरफोडी, चेन स्नॅचिंग, वाहन चाेरी आदी १९ गुन्हे दाखल असणार्‍या तिघा सराईत चाेरट्यांच्‍या मुसक्‍या रामनगर पोलिसांनी आवळल्‍या आहेत.  चोरट्यांकडून ८८ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला आहे.

त्रिमूर्तीनगर येथे राहणारे राहुल उर्फ बुद्धी बबलू सिंग (वय १९, जुनी सरदार ), गुरुदेव सिंग उर्फ काळी नरेश भगानिया ( वय १९) , शिवार ऋषिपाल तुसांबड ( वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

डोंबिवली पूर्व येथील गीतांजली सोसायटी येथून  पायी चालत जात असताना  मोटार सायकलवरून आलेल्‍या तिघांनी आनंद कुमारी याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला हाेता. आनंद कुमारी के ( वय ६७ ) यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती.

रामनगर पोलीस ठाण्याचे पोलिस चोलेगाव ते ठाकुर्ली येथे पेट्रोलिंग करत हाेते. यावेळी दुचाकीवरुन तिघे जण  संशयितरित्‍या फिरतानाआढळून आले. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर डोंबिवली येथील राम नगर, पोलीस ठाणे, चितळसर, मानपाडा अशा विविध ठिकाणी १९ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

त्यांच्याकडून १५ ग्रॅमची सोन्याची चेन (२५ हजार), ॲक्टिवा स्कूटी, १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र (२७ हजार ) आणि १६ हजार ७५० रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र व रोख रक्कम असा एकूण ८८ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनचे पोलिस आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जेडी मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याची उकल केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button