मोशी : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतेय सांडपाणी | पुढारी

मोशी : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतेय सांडपाणी

मोशी : पुढारी वृत्तसेवा : मोशीतील आदर्शनगर भागात चेंबर तुंबला असून त्यातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी पुणे-नाशिक महामार्गावर वाहत आहे. याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दुर्लक्ष होत असून परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.

मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक; जाणून घ्या गाड्यांच्या वेळांतील बदल

पुणे-नाशिक महामार्गा शेजारी आदर्शनगर हद्दीत सांडपाण्याचे चेंबर सतत चोकअप होत आहे. या घाण पाण्यामुळे पादचारी व दुचाकी चालकांना कसरत करावी लागत आहे.

फरार संदीप देशपांडेंच्या अटकपूर्व जामीनासाठी मनसेची धावाधाव

सकाळीच नोकरीच्या ठिकाणी जाण्याची वेळ असते. नेमके यावेळेतच हे घाण पाणी महामार्गावरून वाहत असते. चारचाकी व अवजड वाहनांमुळे हे पाणी अंगावर उडत असल्यामुळे चालक त्रस्त झाले आहेत.

जितेंद्र आव्हाड : ‘गॅसचे वाढलेले दर भोंग्यांवरून जाहीर करा!’

यामुळे दुचाकीस्वार व पादचारी संताप व्यक्त करत आहेत.सांडपाण्यामुळे दुचाकी घसरून यावर महापालिका प्रशासनाने कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात, असे मत स्थानिक नागरिक संतोष बोराटे यांनी व्यक्त केले आहे.

Back to top button