पिंपरी : ज्यूस , सरबत १० रुपये कसे | पुढारी

पिंपरी : ज्यूस , सरबत १० रुपये कसे

पिंपरी : राहुल हातोले : बाजारात आंब्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असताना ठिकठिकाणी आंबा ज्यूस; तसेच लिंबू सरबत 10 रुपयांना मिळत आहे.

आरोग्यास अपायकारक अशा सिजनिंग पावडरपासून हे ज्यूस बनविले जात असल्याची माहिती पुढे येत असून प्रशासनानेही याकडे डोळेझाक केली असल्याचे दिसून येत आहे.

मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक; जाणून घ्या गाड्यांच्या वेळांतील बदल

शहरातील तापमानाने चाळीसी पार केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अशा उन्हाच्या तडाख्यात रसरसीत आणि थंडगार फळांचा ज्यूस कुणाला आवडणार नाही; मात्र शहरात अनेक ठिकाणी ज्यूसच्या स्टॉलवर फळांऐवजी मिळतेय सिजनिंग पावडर पासून बनविलेले धोकादायक ज्यूस.

परंतु याकडे अन्न व औषध प्रशासनाचेे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आरोग्यास अपायकारक पेय सर्रासपणे स्टॉलवर विकले जात आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, रावेत, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव व भोसरी आदी परिसरात जागोजागी ज्यूसचे स्टॉल थाटले आहेत.

फरार संदीप देशपांडेंच्या अटकपूर्व जामीनासाठी मनसेची धावाधाव

यामध्ये बरेच स्टॉलधारक फळे महाग असल्याने फळांऐवजी मानवी आरोग्यासाठी घातक असणार्‍या सिजनिंग पावडरचा वापर करत आहेत. यामुळेे शरीरावर धोकादायक परिणाम होवू शकतो, अशी माहिती शहरातील आहारतज्ज्ञांनी दिली आहे.

बदाम आंबा
120 ते 150 रू. किलो
तोतापुरी
130 ते 170 रू. किलो
मात्र आमरस चक्क 10 रूपयाला?
सरबत
लिंबू : 10 ते 15 रूपये नग मात्र सरबत अवघे 10 रूपयाला?

आरोग्यास अपायकारक सिजनिंग पावडरचा वापर होत असल्याचे चित्र

आंब्याचे दर अजूनही सामान्यांच्या आवाक्यात नाहीत; मात्र आमच्या परिसरात 10 रूपयामध्ये ज्यूस मिळतो; तसेच लिंबू महाग असूनही दहा रूपयांत सरबत मिळते. बर्‍याचदा प्रश्न पडतो की, ज्यूस विक्री करणार्‍यांना एवढ्या कमी किमतीत ज्यूस तसेच सरबत विक्री करणे कसे परवडते? – शरद पवळे, भोसरी, नागरिक.

ज्यूस आणि सरबताच्या नावाखाली पल्प किंवा सिजनींग पावडरचा वापर करणे, म्हणजेच ग्राहकांची विक्रेत्यांकडून झालेली फसवणूकच होय. तसेच या पावडरपासून बनलेला ज्युस आरोग्यासाठी घातक असतो. त्यामुळे सिजनिंग पावडर पासून बनलेल्या ज्यूसचे नमुने विभागाच्या परीक्षण केंद्रामध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.
– ए. जी. भुजबळ, सहाय्यक आयुक्त,
अन्न व औषध प्रशासन विभाग, औंध.

सिजनिंग पावडरमध्ये कार्बोनेट पावडरचा वापर केला जातो. त्याच्या सेवनामुळे प्रतिकार शक्ती कमी होवू शकते. अतिसेवन झाल्यावर पोटदुखी, किडणी आणि आतड्यांच्या समस्या उद्भवू शकतात.
– डॉ. निलम इंगळे,आहारतज्ञ, मोशी.

Back to top button