मनसे -भाजप एकत्र : भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पोस्टची चर्चा | पुढारी

मनसे -भाजप एकत्र : भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पोस्टची चर्चा

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : संघर्षाचे समाजकारण करावे लागले तर पुन्हा एकत्र येऊ, असे म्हणत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. यावरून मनसे -भाजप युतीचे संकेत स्पष्ट झाल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

 रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या पाेस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, कालचा तहान मोर्चा म्हणजे एक प्रकारे ठाकरे सरकारच्या मुर्दाड प्रशासनाविरुद्ध लोकांनी केलेल्या उस्फूर्त प्रतिकार होता. नागरी वस्तीत राहणार्‍या लोकांना सरकारकडूनही प्रशासनाकडून सध्या नागरी सुविधा मिळाव्या अशा अपेक्षा असतात.

मात्र एकही नागरी सुविधा मिळत नाही आणि पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र बनत चालली आहे. अजून मे महिना बाकी आहे. हे गेले अनेक महिने सुरू आहे. घोटाळेबाज सरकार आणि अधिकाऱ्यांच्या नाकातोंडात पाणी आणल्याशिवाय आता जनता गप्प बसणार नाही. असे आमदार चव्हाण यांनी म्‍हटलं आहे.

भाजप या नावातच अवघा महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावातच अवघा महाराष्ट्र आहे. देशाच्या आणि राज्याच्या जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांसाठी संघर्षाचे समाजकारण करावे लागले तर पुन्हा एकत्र येऊ ही खात्री देतो, असे सूतोवाच त्यांच्या पोस्टद्वारे त्यांनी केले आहे.

कालचा पाण्याचा मोर्चा हा मनसे -भाजप एकत्रीकरणाची नांदीचअसल्याचे बोलले जात आहे. याची सुरुवात कल्याण-डोंबिवलीतून झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : 

Back to top button