ठाणे : पुढारी वृत्तसेवा : आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नगरसेवक नील सोमय्या यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर सोमय्या पितापुत्र नॉट रिचेबल आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या घरासमोर पोस्टर लावले आहेत. यावर कुठे गायब झाले सोमय्या?, आपण यांना पाहिलेत का? असा मजकूर लिहिण्यात आला आहे. हे पोस्टर शहरात चर्चेचे विषय ठरले आहेत.
दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्थानिक भाजप नेते, कार्यकर्ते यांच्यासमवेत आंदोलन केले होते. त्यानंतर आता भाजप नेत्यांच्या घर आणि कार्यालयासमोर आज (बुधवार) शिवसेना आमदार सरनाईक यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले आहेत. हे पोस्टर लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचलंत का ?