ठाणे : जुन्या वादातून मित्रावर धारदार शस्त्राने वार | पुढारी

ठाणे : जुन्या वादातून मित्रावर धारदार शस्त्राने वार

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका रिक्षाचालकावर तलवार आणि कोयत्याने वार करण्याची घटना आज (बुधवार) घडली आहे. हा रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बाबू सोनावणे आणि अर्जुन सोनावणे अशी मारहाण करणाऱ्या दोन इसमांची नावे आहेत. चिकणीपाडा तिसगाव रोड येथे राहणारे २५ वर्षीय रामाराव तामाड हे रिक्षाचालक आहेत. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तिसगाव शाखा येथील रिक्षा स्टँडवर ते उभे होते. यावेळी तामाड यांच्या पाठीमागून येऊन बाबू सोनावणे यांनी तलवारीने तामाड यांच्या डोक्यात वार केले. त्यानंतर त्यांचा पाठलाग करून त्यांना रस्त्यावर खाली पडून पुन्हा अर्जुन सोनावणे यांनी हातावर कोयत्याने वार केले. जखमी तामाड यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button