डोंबिवली : गॅस एजन्सी कर्मचाऱ्यास बेदम मारहाण, माजी आमदार संजय दत्त यांच्याविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

डोंबिवली : गॅस एजन्सी कर्मचाऱ्यास बेदम मारहाण, माजी आमदार संजय दत्त यांच्याविरोधात गुन्हा दाखल

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : गॅस एजन्सी येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांनी काम सोडल्यानंतर तो इतर कामगारांना काम सोडा असे भडकवत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे माजी आमदार संजय दत्त यांनी पिसवली येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यास लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. याआधी देखील एका गॅस वितरकाने आगाऊ पगार मागितल्याने माजी आमदार संजय दत्त याच्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.

याबाबतची माहिती अशी की, दीपक निकाळजे (वय २७) हा भारत गॅस एजंसी येथे काम करत होता. १५ दिवसांपूर्वी याने ही नोकरी सोडली. मात्र, इतर कामगारांना काम सोडण्यासाठी भडकवत असल्याचा आरोप करत माजी आमदार संजय दत्त यांनी त्याला धमकावण्यास सुरूवात केली.

संजय यांनी दीपकला फोनवरून तुला घरातून उचलून नेईन, तुला माहित नाही मी कोण आहे? अशा प्रकारची धमकी दिली होती. यानंतर तिघांनी जण शुक्रवारी मध्यरात्री दीपकच्या घरात जबरदस्ती शिरून लोखंडी रॉडने डोक्यात, पोटात मारहाण केली. यावेळी तिघांनी आमदार संजय दत्तची आम्ही माणसे असल्याचे सांगितले.

यासंदर्भात दीपक यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केला आहे. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे , मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळू वंजारी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button