बीड : गेवराईत दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू | पुढारी

बीड : गेवराईत दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेवराई शहरात जुन्या बसस्थानकासमोर दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्‍या तरुणाचा मृत्‍यू झाला. अविनाश उर्फ बदाम गंगाधर जोंधळे (वय-१९, रा.ताकडगाव) असे त्‍याचे नाव आहे.

या घटनेसंबंधी सविस्तर माहिती अशी की,  २१ फेब्रुवारी राेजी  रात्री ८ वाजण्याच्या सुमारास  गेवराई शहरातील जुन्या बसस्थानकासमोर दुचाकींची  समोरासमोर जोरादार धडक झाली. अविनाश उर्फ बदाम  जोंधळे गंभीररित्या जखमी झाला. नागरिकांनी त्‍याला तातडीने गेवराई रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले.  बीडला जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

हे वाचलंत का? 

Back to top button