नाशिक : पैसे देण्यास नकार दिल्याने युवकावर कोयत्याने वार | पुढारी

नाशिक : पैसे देण्यास नकार दिल्याने युवकावर कोयत्याने वार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा : जामीनसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या चार युवकांनी ओळखीच्याच युवकावर लोखंडी रॉड व कोयत्याने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर संबंधित युवकाच्या इनोव्हा कारचे नुकसान केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे वृत्त असे की, सनी अरुण पगारे (रा. सौभाग्यनगर, चांदनी अपार्टमेंट, लॅमरोड, नाशिकरोड) हा युवक सुभाषरोड येथे आपली इनोव्हा कारने (एमएच 01 एएल 0550) जात असताना त्या ठिकाणी त्याचे ओळखीचे मित्र सोनू पांडव, संदेश वाघ, राकेश वाघ, रिचड साळवे (सर्व रा. सुभाषरोड) यांनी पगारे यास थांबविले. ‘आम्हाला जामिनासाठी पैशाची मदत कर,’ असे म्हणाले असता, पैसे देण्यास पगारे यांनी नकार दिल्याने संतप्त झालेल्या संशयितांनी पगारे याच्यावर लोखंडी रॉड व कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याचप्रमाणे इनोव्हा कारची काच फोडून नुकसान केले. दरम्यान, या प्रकरणी सनी पगारे याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शेळके व हवालदार कोकाटे हे करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button