डोंबिवली : माहेरी आलेल्या माय-लेकीला मारहाण, सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास | पुढारी

डोंबिवली : माहेरी आलेल्या माय-लेकीला मारहाण, सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने माहेरी आलेल्या माय- लेकीला घरात घुसून मारहाण करत घरातील १३ तोळे सोन्याच्या दागिन्यासह रोकड चोरांनी लंपास केली. ही घटना कल्याण येथील खडकपाडा परिसरात घडली आहे. खडकपाडा पोलीस या घटनेचा तपास करत असून माय- लेकीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण- डोंबिवलीत घरफोडी, वाहन चोरी, चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली असून चोरीचे सत्र सुरूच आहे. याच दरम्यान माघी गणेश उत्सवासाठी माहेरी आलेल्या लेकीला आणि आईला चोरट्यांनी बेदम मारहाण करत घरातील दागिन्यासह रोकड लपास केली. कल्याणजवळच्या आटाळी मानी या गावात ही घटना घडली आहे.  (माहेरी आलेल्या माय- लेकीला मारहाण )

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, आटाळी मानी येथील वत्सला चिकणो यांच्या घरी त्यांची विवाहित मुलगी सारिका चव्हाण आणि तिच्या दोन मुलांसोबत माघी गणपतीच्या निमित्ताने माहेरपणाला आली होती. रविवारी (दि. ६) रोजी रात्री गणेश विसजर्नानांतर सारिका आणि तिच्या दोन मुलीसोबत घरात झोपले होते.

या सुमारास मध्यरात्री घरात कोणीतरी फिरले असल्याचे वत्सलाबाई यांच्या लक्षात आले मात्र त्यांनी आरडाओरडा करण्याआधी तिच्या डोक्यात चोरट्यांनी हल्ला केला याच दरम्यान झालेल्या आवाजाने सारिकाला जाग आली तिने चोरांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली मात्र तिलादेखील चोरांनी मारहाण केली.

घरात घूसून दोन महिलांना जखमी करुन लूटमारीच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खडकपाडा पोलीसांना याची माहिती देण्यात आली. खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button