डोंबिवली : वंचितकडून तृतीय पंथियाना निवडणूकीसाठी आवाहन

डोंबिवली महपालिका
डोंबिवली महपालिका

डोंबिवली, पुढारी वृत्‍तसेवा : कल्याण डोंबिवली महपालिकेत निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली असतानाच वंचित बहुजन आघाडी मात्र ज्या कोणी तृतीय पांथियाना पालिकेची निवडणूक लढवायची असेल त्यांना आमच्या पक्षाकडून तिकीट देण्यात येईल असे आवाहन करत आहे . वंचितांना आधार देणारं असून वंचित असणाऱ्या प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार असल्याचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बोलताना सांगितले.

वंचित बहुजन समाज या पक्षाने 2019 ला लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभेच्या निवडणुकीत रामटेक नागपूर येथील एक उमेदवार कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी लढले होते. त्यावेळी शिवसेनेतून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे विजयी झाले असले तरी वंचितचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर मत घेणारे ठरले. त्यांनतर कल्याण शहरच नव्हे तर संपूर्ण राज्यात याची चर्चा रंगली होती. मात्र विधानसभेला वांचीतच्या उमेदवाराचा अर्ज काही तांत्रिक कारणामुळे बाद करण्यात आला.

गेली तीन वर्ष वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने छेडून अनेक सामाजिक विषयाना वाचा फोडली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित आणि इच्छुक उमेदवारांना तिकिटे देणार असल्याचे सांगण्यात आले असून तृतीय पंथियाना सहभागी करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ज्या तृतीयपंथीयांना तिकीट हवे आहे त्यांनी घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटावे असे सांगताना सर्वधर्मसमभाव राखणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचलं का  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news