हिंगोली : ‘आखाडा बाळापूर स्मारकास उद्यान करून संसदरत्न राजीव सातव यांचे नाव द्या’ | पुढारी

हिंगोली : 'आखाडा बाळापूर स्मारकास उद्यान करून संसदरत्न राजीव सातव यांचे नाव द्या'

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा: आखाडा बाळापूर येथील हुतात्मा स्मारकामध्ये काटेरी गवत वाढले असून येथील वाचनालय अनेक वर्षापासून बंद आहे. येथे कळमनुरीच्या धर्तीवर उद्यान करा व त्यास संसदरत्न खासदार राजीव सातव यांचे नाव द्यावे अशी मागणी मधुकर चेटप यांनी मागणी केली आहे.

याबाबत मराठवाडा जनता विकास परिषद आखाडा बाळापूर अध्यक्ष मधुकर चेटप यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले आहे की, बरेच कालावधीपासून येथील वाचनालय बंद अवस्थेत असून प्रांगणात काटेरी गवत वाढले आहे. स्मारकाचा कुठलाही उपयोग नागरिकांना सध्या होत नाही ही वास्तू जीर्ण होत चालली आहे.

तसेच ही या वास्तूच्या प्रांगणाची स्वच्छता करून बगीचा फुलाफलांनी नटलेला असावा. वास्तूची इमारत व प्रांगण नागरिकांच्या उपयोगात यावी आणि सायकाळच्या सुमारास उधानाची सफर नागरिक व महिला बालकांना व्हावी, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे. तर तालुका कळमनुरी येथील बाळासाहेब ठाकरे उद्यानासारखे हे उद्यान करावे आणि संसदरत्न खासदार राजीव सातव यांचे नाव द्यावे अशी मागणी मधुकर चेटप यांनी केली आहे. मराठवाडा जनता विकास परिषदच्या वतीने हिंगोली पालक मंत्री वर्षा गायकवाड यांना ते भेटणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button