सोलापूर : राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष, नगरसेवकाला जुगार खेळताना अटक

सोलापूर : राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष, नगरसेवकाला जुगार खेळताना अटक

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा: सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष, नगरसेवकांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्‍यात आले. मंगळवेढा पोलिसांनी शनिवारी ( दि. २७) रात्री ही कारवाई केली आहे. नगरसेवकच जुगार खेळत असल्याने राजकीय वरदहस्तानेच हे जुगार अड्डे सुरु असल्याचा आरोप केला जात आहे.

गेल्या आठवड्यात पोलिसांनी औरंगाबादमधील जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक या जुगार अड्ड्यावर सापडले होते. यानंतर आता पंढरपूरमध्ये नगरसेवक जुगार खेळताना सापडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.  मंगळवेढा येथे माजी नगराध्यक्षाच्या कार्यालयातच जुगाराचा डाव सुरु होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाड टाकली आणि जुगाराचा डाव उधळून लावला. मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, नगरसेवक प्रवीण खवतोडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष आणि अनेकजण येथे जुगार खेळत असल्याचे पोलिसांना दिसून आले.

पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे माजी नगराध्यक्षाच्या कार्यालयातच हा जुगाराचा डाव सुरु होता. येथे छुप्या पद्धतीने जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी ही कारवाइई केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news