सोनाली फोगाट क्राईम स्टोरी : अनुत्तरीत प्रश्नांचं काय करायचं?

सोनाली फोगाट क्राईम स्टोरी : अनुत्तरीत प्रश्नांचं काय करायचं?

पणजी; दीपक जाधव : टिक टॉक स्टार, अभिनेत्री आणि भाजपच्या हरियाणातील नेत्या सोनाली फोगाट यांच्या खून प्रकरणी अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिकाच अधोरेखित होते आहे. खून झाला त्या दिवशी रात्री नेमके काय घडले, ते सत्य समजणार का? हा प्रश्नच आहे.

सोनाली यांचे स्वीय सहायक सुधीर सांगवान व मित्र सुखविंदर सिंग अटकेत असून त्यांनी खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम लक्षात घेता तपास यंत्रणेभोवती अनेक प्रश्नांचे जाळे तयार होत आहे. हा थंड डोक्याने केलेला खून असल्याने याचा सखोल तपास होण्याची गरज आहे. सोनाली सहकार्‍यांसोबत सोमवार, 22 रोजी गोव्यात आल्या होता. त्या उत्तर गोव्यातील हणजूण येथील द ग्रॅण्ड लिओनी रिसॉटमध्ये मुक्कामास होत्या. त्याच रात्री त्या तेथील कर्लिस बारमध्ये जेवणासाठी गेल्या होत्या. तेथे त्या सहकार्‍यांसोबत नाचतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमात धुमाकूळ घालतो आहे. त्यामुळे सहकार्‍यांकडून दगाफटका होईल, अशी जराही शंका त्यांना आलेली नसावी. याचाच अर्थ संशयितांनी त्यांचा खून केला असेल तर तो अतिशय थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध केला असे म्हणण्यास वाव आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता मास्टर माईंड कोणीतरी दुसराच असण्याची शक्यता आहे.

सोनाली यांनी सोमवारी रात्री आईशी संवाद साधला होता. जेवल्यानंतर आपल्याला त्रास होत असल्याचे सोनाली यांनी आईला सांगितलेले होते. ही माहिती त्यांची बहीण रुपेश यांनी दिलेली आहे. याचा अर्थ त्यांना त्रास होतो, हे जाणवत होते. मात्र, त्यांना त्याचे नेमके कारण कळले नसावे. बारमधील सीसीटीव्ही फुटेजनुसार सोनाली यांना पेयातून घातक द्रव्य पाजल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेपूर्वीही हे द्रव्य पाजले असण्याची शक्यता आहे. बाथरूम सिल करण्यास विलंब का?ज्या महिला बाथरूममध्ये मृत्यूपूर्वी सोनाली यांना दोन तासांहून अधिक काळ ठेवण्यात आले होते, हे बाथरूम पोलिसांनी घटनेच्या चौथ्या दिवशी म्हणजे शनिवार, 27 रोजी सील केले. फॉरेन्सी लॅबचे तज्ज्ञही शनिवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गेल्या चार दिवसात संशयितांनी हॉटेल व्यवस्थापनाला हाताशी धरून बाथरूममधील पुरावे नष्ट केले नसतील कशावरून? येथे जाणीवपूर्वक विलंब केला गेला का?

संपत्तीचे आकडे आणि संशयास्पद कारण

सोनाली यांचा संपत्तीसाठी खून केल्याचा दावाही असाच संशयास्पद असाच आहे. त्यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 2 कोटी 74 लाख 11 हजारांचा उल्लेख आढळतो. यात 25 लाख 61 हजार जंगम आणि 2 कोटी 48 लाख 5 हजार इतकी स्थिर मालमत्ता आहे. त्यांच्या 3 बँक खात्यामध्ये 5 लाख 11 हजार रुपये असून त्यांच्याकडे 12 लाख 50 हजारांची रोकड आहे. त्यांच्याकडे नोएडा सेक्टर-52 येथे फ्लॅट असून हिसार येथील गंगवा येथे 117 क्षेत्रफळाची जमीन आहे. सोनाली यांचे सारे व्यवहार सुधीर पहात होता. त्यांचे एटीएम कार्डही त्याच्याजवळच असायचे. त्यामुळे संपत्तीसाठी खून केल्याचे कारणही तकलादू वाटत आहे.

प्रबळ नेत्या नव्हत्या, त्यामुळे…

हा खून संपत्ती मिळविण्यासाठी आणि त्यांची राजकीय कारकिर्द संपविण्यासाठी केल्याचे संशयितांनी सांगितले आहे. संशयितांच्या या कबुली जबाबालाच संशयाचा वास येत आहे. कारण सोनाली या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदमपूर (हरियाणा) मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढल्या होत्या. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांच्याकडे नवी दिल्ली, चंदिगड व हरियाणा राज्यांच्या अनुसूचित जमाती शाखेच्या प्रभारी पदाची जबाबदारी भाजपने दिली होती. त्यातच हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुका 2024 मध्ये होणार आहेत. त्यामुळे त्यांचा काटा काढून रस्ता साफ करण्याइतक्या प्रबळ नेत्याही त्या नव्हत्या. त्यामुळे संशयितांचा हा दावा कितपत सत्य मानावा, हा प्रश्न आहे.

सोनाली फोगाट क्राईम खून प्रकरण

अर्थ त्यांना त्रास होतो, हे जाणवत होते. मात्र, त्यांना त्याचे नेमके कारण कळले नसावे. बारमधील सीसीटीव्ही फुटेजनुसार सोनाली यांना पेयातून घातक द्रव्य पाजल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेपूर्वीही हे द्रव्य पाजले असण्याची शक्यता आहे. बाथरूम सिल करण्यास विलंब का?ज्या महिला बाथरूममध्ये मृत्यूपूर्वी सोनाली यांना दोन तासांहून अधिक काळ ठेवण्यात आले होते, हे बाथरूम पोलिसांनी घटनेच्या चौथ्या दिवशी म्हणजे शनिवार, 27 रोजी सील केले. फॉरेन्सी लॅबचे तज्ज्ञही शनिवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गेल्या चार दिवसात संशयितांनी हॉटेल व्यवस्थापनाला हाताशी धरून बाथरूममधील पुरावे नष्ट केले नसतील कशावरून? येथे जाणीवपूर्वक विलंब केला गेला का?

बाथरूममधील दोन तासांचे गूढ

सुधीर व सुखविंदर यांनी सोनाली यांना बाथरुममध्ये नेले त्यावेळी सोनाली अडखळत अडखळत चालत होत्या. त्यांना तब्बल दोन तास बाथरुममध्ये ठेवण्याचे कारण काय होते? महिलांच्या बाथरुममध्ये हे दोघे गेलेच कसे? तेथे दोन तास थांबलेले असताना ही बाब हॉटेलमधील कोणाच्याच निदर्शनास का आली नाही? नशेतील सोनाली यांना इंजेक्शनच्या माध्यमातून ड्रग्स दिला गेला का?

डॉली नामक कोकेन?

पोलिसांनी मेथाम्फेटॅमिना (चशींहराहिशींराळपश) नामक ड्रग्स सोनाली यांना संशयितांनी दिले होते, असे शनिवारी म्हटले आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मात्र 'डॉली' हे कोकेन प्रकारातील ड्रग्स सोनाली यांना दिले होते.त्याच्या अतिसेवनाने स्मृतीभ्रंश होणे, अस्तित्व हीन होणे तसेच हृदयविकाराचा तीव्र झटका येणे या गोष्टी होतात. डॉली हे इंजेक्शनच्या माध्यमातूनही दिले जात असल्याने त्या दोन तासात सोनाली यांना 'डॉली'चा इंजेक्शनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दिल्याची शक्यता सूत्रांना वाटते. त्यामुळे त्यांना तीव्र
हृदयविकाराचा झटका येवून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर संशयितांनी त्यांना रुग्णालयात नेले का? हा घातपात नव्हे तर हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे सिद्ध करण्याचा संशयितांचा हेतू होता का? यासारखे प्रश्न अनुत्तरीत राहतात.

पोलिसांची गतीही प्रश्नांकित

विनयभंगाची तक्रारही तातडीने नोंदवून घेण्याचे निर्देश पोलिसांना आहेत. सोनाली यांच्या मृत्यूनंतर भाऊ रिंकू ढाका यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला, सीबीआय चौकशीचीही मागणी केली होती. तरीही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी केलेली दिगंगाई संशयास्पद आहे. पोलिस संशयितांशी संगनमत करून हा हृदयविकारानेच झालेला मृत्यू असल्याचे भासविण्याचा प्रयत्न तर करीत नव्हते ना? गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांची अटक, त्यांनी दिलेला कबुली जबाब आणि पोलिस अधिकार्‍यांची पत्रकार परिषद या घडामोडीतील विलक्षण गतीही संशयास्पद वाटावी, अशीच आहे. अटक केल्यानंतर संशयितांनी काही मिनिटांतच गुन्ह्याची दिलेली कबुली पाहता, तपास काम पूर्ण करण्यासाठी पोलिसांचा खटाटोप तर नाही ना?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news