पिरॅमिडपेक्षाही जुनी आहे ही मानवनिर्मित रचना | पुढारी

पिरॅमिडपेक्षाही जुनी आहे ही मानवनिर्मित रचना

वॉशिंग्टन : इजिप्तमधील तीन-चार हजार वर्षांपूर्वीचे भव्य पिरॅमिड आजही आपल्याला तत्कालिन मानवांच्या कौशल्याने थक्क करीत असतात. अमेरिकेत एक मानवनिर्मित रचना आहे जी इजिप्तच्या या पिरॅमिडपेक्षाही अधिक जुनी असल्याचे आढळले आहे. टेकड्यांसारखी ही रचना तब्बल अकरा हजार वर्षांपूर्वीची असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

या रचनेला ‘एलएसयू माऊंड्स’ या नावाने ओळखले जाते. ‘एलएसयू’ म्हणजे लुसियाना स्टेट युनिव्हर्सिटी. या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हिरवळीने नटलेल्या या दोन छोट्या टेकड्या किंवा उंचवटे आहेत. त्यांची उंची 20 फूट किंवा 6 मीटर आहे. लुसियानामध्ये मानवनिर्मित अशा 800 टेकड्या आहेत. अमेरिका खंडात राहणार्‍या प्राचीन काळातील मानवांनी या मातीच्या उंचवट्यांची निर्मिती केली होती. या टेकड्यांवरील हिरवळीखाली चिखल, माती आणि राखेचा प्राचीन स्तर आहे.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले की यापैकी सर्वात प्राचीन माऊंड हा 11 हजार वर्षे जुना आहे. उत्तर किंवा दक्षिण अमेरिकेतील ही सर्वात जुनी मानवनिर्मित रचना ठरली आहे. धार्मिक किंवा उत्सवाच्या विधींसाठी या टेकड्यांचा वापर केला जात असावा, असे संशोधकांना वाटते.

Back to top button