Solapur news | जागतिक नेत्रदान दिन ! एकाच्या नेत्रदानाने दुसऱ्याचे आयुष्य बनते प्रकाशमय

जागतिक नेत्रदान दिनाच्या आजच्या दिवशी याविषयी जनजागृती होणेच आवश्यक आहे
Solapur news | जागतिक नेत्रदान दिन ! एकाच्या नेत्रदानाने दुसऱ्याचे आयुष्य बनते प्रकाशमय
Published on
Updated on

सोलापूर : मरणोत्तर नेत्रदान करून दुसऱ्याला दृष्टी देता येते. हे मोठे पुण्यकार्य आहे. शरीरातील अनेक अवयव मृत्यूनंतर निकामी होतात. पण, डोळे मात्र मृत्यूनंतरही काही तास जिवंत राहू शकतात. समाजातील अंधश्रद्धा व अज्ञानामुळे नेत्रदानाचे प्रमाण कमी आहे. यात वाढ होणे अपेक्षित आहे. जागतिक नेत्रदान दिनाच्या आजच्या दिवशी याविषयी जनजागृती होणेच आवश्यक आहे.

नेत्रदानाबद्दल आजही समाजात भीती असून ती दूर करणे व त्यांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी १० जून रोजी जागतिक नेत्रदान दिन साजरा केला जातो. काळोखात हरवलेल्यांच्या आयुष्याला दृष्टी दानाने जगातील सर्वात सुंदर देणगी देता येते. पण दुर्दैवाने, अनेक व्यक्ती जन्मापासून किंवा अपघातामुळे अंधारात जगतात.

Solapur news | जागतिक नेत्रदान दिन ! एकाच्या नेत्रदानाने दुसऱ्याचे आयुष्य बनते प्रकाशमय
Digital Twin technology | ‘डिजिटल ट्विन’च्या जगात

मानवी शरीराचा असा एक अवयव जो मृत्यूनंतरही जिवंत राहून दुसऱ्याला दृष्टी देऊ शकतो, तो फक्त डोळे. नेत्रदानाचे महत्त्व व त्यातील तांत्रिक बाबीही समजून घेणे ही काळाची गरज बनली आहे. मृत्यूच्या अगोदर सहा ते आठ तासांच्या आत डोळे काढणे आवश्यक असते. नेत्रदान चळवळीशी संबंधित संस्थेशी संपर्क साधून डोनर कार्ड मिळवणे सोपे आहे.

Solapur news | जागतिक नेत्रदान दिन ! एकाच्या नेत्रदानाने दुसऱ्याचे आयुष्य बनते प्रकाशमय
Hindu Kush Himalaya: हिंदू कुश हिमालयावरील बर्फ वितळण्याचा वेग वाढला... थराची जाडी तब्बल २७ मीटरने झाली कमी, आशिया खंडाला धोका?

नेत्रदानाची चळवळ यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. अनेकदा कुटुंबातील सदस्यांना नेत्रदानाची प्रक्रिया माहितीही नसते. यामुळे मृताची इच्छा असूनही नेत्रदान राहून जाते. नेत्रदानाच्या इच्छेबद्दल प्रत्येकांनी पुढे येणेही गरजेचे आहे. एक डोळा दोन व्यक्तींना दृष्टी देतो. या उपक्रमात सहभाग नोंदवावा. यामुळे एका गरजूला त्याच्या उर्वरित आयुष्यात प्रकाशाचा किरण फुलवू शकतो.

Solapur news | जागतिक नेत्रदान दिन ! एकाच्या नेत्रदानाने दुसऱ्याचे आयुष्य बनते प्रकाशमय
Russia Alaska dam project | हवामान बदल रोखण्यासाठी रशिया-अलास्कादरम्यान अवाढव्य धरण?

असे करा नेत्रदान...

  • नेत्रदान करू इच्छिणाऱ्याने नेत्रपेढीमध्ये नाव नोंदणी करावी

  • नेत्रदानासाठीचा फॉर्म भरून घ्या व डोनर कार्ड प्राप्त करा

  • आपल्या कुटुंबातील अन्य सदस्यांना आपल्या निर्णयाविषयी कल्पना द्यावी

  • दात्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संबंधित नेत्रपेढीला तात्काळ कळवावे

  • जेणेकरून वेळेत डोळे काढण्याची प्रक्रिया करता येईल

  • नेत्रदान करण्यासाठी वयाची किंवा लिंगाची अट नाही

  • चष्मा वापरणारे, मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्णही नेत्रदान करू शकतात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news