Velapur Palkhi News | वेळापूरची अर्धनारी नटेश्वराची नगरी सज्ज

श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा पालखी सोहळा बुधवार दि 2 जुलै रोजी वेळापूर मुक्कामी येत आहे.
Velapur Palkhi News
वेळापूर : वेळापूर येथे उभारण्यात आलेली स्वागत कमान दिसत आहे.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

धनंजय पवार

वेळापूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा पालखी सोहळा बुधवार दि 2 जुलै रोजी वेळापूर मुक्कामी येत आहे. यासाठी आमदार उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूरची अर्धनारी नटेश्वर नगरी ग्रामपंचायतीच्या वतीने वैष्णवांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी सज्ज असल्याचे सरपंच रजनीश बनसोडे यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच नानासाहेब मुंगूस कर,ग्रामविकास अधिकारी कैलास सुरवसे,माजी उपसरपंच जावेद मुलाणी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यासाठी पालखीतळ परिसरातील सर्व चारही डी.पी. कार्यान्वित करून पोलवरील असणारे सर्व हायमास्ट दिवे सुरू करण्यात आले आहेत.

Velapur Palkhi News
वेळापूर येथील अपघातात तरुणाचा मृत्यू

वेळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीतळ येथील लहान-मोठे खड्डे बुजऊन, लहान स्वरूपाची खरी टाकून रोलिंग करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. बंदिस्त गटारी वरती पावडर टाकण्यात येत आहे. यामुळे जरी पाऊस आला तरी वारकर्‍यांना पालखी सोहळ्याला अडथळा होऊ नये. यासाठी पूर्णपणे सपाटीकरण करण्यात आले आहे. सुरवसे हॉस्पिटल ते पालखीतळ या रस्त्याचे कार्यान्वित करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाच्यावतीने डि.4 कॅनल व मायनर मळखांबी तसेच पालखीतळा समोरील फाट्यास पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी वारकर्‍यांना कपडे धुण्यासाठी व स्वच्छतेसाठी आंघोळीसाठी उपयोग होणार आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीतळाच्या पूर्व बाजूने बोरगाव रस्त्या पर्यत रस्ता यावर्षी तयार करण्यात आल्याने वारकर्‍यांची सोय होणार आहे.

Velapur Palkhi News
Solapur News | वैयक्तिक स्वच्छतागृहांच्या उद्दिष्टात होतेय घट

तसेच वारकर्‍यांसाठी मोठ्या जर्मन मंडप ठोकण्यात आले असून या ठिकाणी वारकरी विश्रांती कक्षाची स्थापना करण्यात आले आहे. वेळापूर ते सांगोला रस्त्यावरील पूर्व बाजूच्या निम्या रस्त्याचे पक्के डांबरीकरण पूर्ण झाले. यासाठी वारकर्‍यांना हा मार्ग सुखकर होणार आहे. पालखी मुक्कामी पश्चिम दिशेला आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाची उभारणी करण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने ही या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून वारकर्‍यांसाठी सेवा देण्यात येणार आहे. पालखीतळ परिसरात रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

Velapur Palkhi News
Palkhi Arrives Pune | पालखी पुण्यनगरीच्या अंगणात !

सरकारच्या वतीने 1800 फिरते मोबाईल शौचालय ची व्यवस्था वेळापूर परिसरात अशी करण्यात आली आहे पालखी सोहळा पालखी तळ मुक्कामी जाताना कमानीच्या डाव्या बाजूस श्री विठ्ठलाची मोठी मूर्ती ठेवण्यात येत आहे. महिलांसाठी स्नान गृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने प्राथमिक उपचार केंद्र पालखीतळ, ठाकुरबुवा, तोंडले, बोडले या चार ठिकाणी मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. यासाठी 108 व 102 या दोन फिरत्या रुग्णवाहिका, पाणी शुद्धीकरण, हातपंप शुद्धीकरण, हॉटेल मालकांना स्वच्छता ठेवण्याबाबत पत्र, पालखी मार्गावरील सर्व विहिरींचे शुद्धीकरण करण्यात आले आहे.

Velapur Palkhi News
Pandharpur News | पंढरपुरात चंद्रभागा नदीचा पूर ओसरु लागला

पालखीतळ येथे ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्य चौक, दर्शन रांग, पालखी प्रवेशद्वार कमान व मुक्कामानंतर बाहेर जाण्याचा मार्ग येथे स्वागत कमानी लावण्यात आल्या आहेत. पालखीतळ परिसरातकॅमेरे व जनरेटरची सोय करण्यात आली आहे. बुधवार दि. 2 जुलै रोजी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत वेळापूरकरांच्यावतीने सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेव मुंगूसकर, ग्रामविकासा अधिकारी कैलास सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावतीने करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news