

सोलापूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यात वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यात येत आहेत. मागील पाच वर्षात 16 लाख 74 हजार वैयक्तिक शौचालये बांधून पूर्ण झाले आहेत. मात्र, मागील पाच वर्षाची आकडेवारी पाहता प्रत्येक वर्षी उद्दिष्टांची संख्या घटत असल्याचे चित्र राज्यात दिसत आहेत. ते उद्दिष्टे वाढवावे, अशी मागणी राज्यातून होत आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यात सन 2019 ते 2024 दरम्यान 16 लाख 75 हजार वैयक्तिक शौचालयांची उद्दिष्टे देण्यात आले होते. त्यातील 16 लाख 74 हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, ते वापरण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात आणखी जास्त उद्दिष्टे देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, निधीची कमरतता असल्याने शासनाकडून वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्टे कमी देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.