सोलापूर : म्हैसलगी येथील भीमा नदीत बुडून दोन मुलींचा मृत्यू

सोलापूर : म्हैसलगी येथील भीमा नदीत बुडून दोन मुलींचा मृत्यू

हंजगी, पुढारी वृत्तसेवा : म्हैसलगी (ता.अक्कलकोट) येथील भीमा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा शुक्रवारी (दि.१०) बुडून मृत्यू झाला. ही घटना सकाळी आकराच्या सुमारास घडली. आरती निकंबे (वय १६) व सपना (वय ९) अशी या मुलींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, आरती व सपना या दोघी म्हैसलगी येथील भीमा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी सपना पाय घसरून नदीपात्रात पडल्याने बुडाली. तिला वाचवण्यासाठी आरती गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने  तिचाही बुडून मृत्यू झाला. दरम्यान दोघींच्या कुटुंबियांनी दोघींचा परिसरात  शोध घेतला. त्यानंतर नदी पात्राच्या परिसरात जाऊन केली पाहणी केली. यावेळी नदीपात्रात दोघींचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने दोघींचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे म्हैसलगी गावावर शोककळा पसरली आहे.

  हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news