सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूरची कन्या, कु.भुवनेश्वरी जाधव हिने नुकतेच लास वेगास (अमेरिका) येथील US OPEN 2022 ह्या जागतिक कराटे घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत महिला गटात 1 रौप्य व 2 कास्य पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला बनून सोलापूर शहर जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर झळकविले. तसेच तिने स्पेन व पॅरिस येथे झालेल्या स्पॅनिश ओपन कराटे इंटरनेशनल आणि कराटे 1 सिरीज ए मध्ये देखील घवघवीत यश संपादन केले आहे. मंगळवारी (दि. 26) सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी सोलापूरचा सुपुत्र चि. पंचाक्षरी लोणार ह्याने पुणे (बालेवाडी) येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धा मिस्टर युनिव्हर्स 65 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळविले. तसेच नॅशनल स्पर्धेत रौप्य पदक, महाराष्ट्र श्री स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्या बद्दल देखील जिल्हाधिकारी यांनी त्याचा सत्कार केला.
ह्या दोन्ही यश खेळाडूंनी सोलापूरची मान जागतिक स्तरावर उंचावली असून पंचाक्षरी लोणार याला अन्वर सर यांचे मार्गदर्शन आणि रवींद्र पाटील यांचे प्रायोजकत्व तसेच संतोषभाऊ पवार यांचे सहकार्य मिळाले आहे. तसेच भुवनेश्वरी हिला स्वामी रामदेव यांच्या पतंजली उद्योग समूहाचे प्रायोजकत्व लाभले मिळाले. तिचे वडील स्व.सुरेश जाधव यांची प्रेरणा तिला वयाच्या ४थ्या वर्षापासून मिळत आहे. त्यांच्यामुळेच ती हे यश मिळाले, असे भुवनेश्वरीने सांगितले.
यावेळी सत्कारप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव संतोषभाऊ पवार, श्रीमती संगीता सुरेश जाधव, राष्ट्रवादी सोशल मीडियाचे मिलिंद गोरे, युवराज माने, श्यामभाउ गांगर्डे व मिहिर जाधव तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा