Solapur News : सांगोला येथील शेतकरी महिला सूतगिरणीवर ‘शेकाप’चा झेंडा

Solapur News : सांगोला येथील शेतकरी महिला सूतगिरणीवर ‘शेकाप’चा झेंडा
Published on
Updated on

सांगोला : पुढारी वृत्तसेवा: सांगोला येथील शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली. १९ उमेदवार मोठया मताधिक्याने निवडून आले आहेत. आज (दि.८) मतमोजणी झाली. या निवडणुकीत शेकापच्या दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे २१ पैकी २१ जागा जिंकून शेकापने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. निकालानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. (Solapur News)

निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

कापूस उत्पादक शेतकरी महिला संघातून बाबर वंदना तानाजी ८०१, पाटील शुभांगी सयाजीराव ८०१, हजारे शालन महादेव ७९३, रसाळ शोभा सुरेश ७९३, वाघमोडे उज्ज्वला संजय ७९३, बंडगर विमल सुबराव ७८९, खतीब शबाब जमीद ७८९, पाटील मालन विष्णू ७८९, मदने सुरेखा संजय ७८५, कोळेकर छाया सोपान ७७५, यमगर मायाक्का मायाप्पा ७७५, (Solapur News)

बिगर कापूस उत्पादक शेतकरी महिला मतदारसंघ –

ढोबळे प्रतिभा शिवाजीराव २६८, जोशी नम्रता नागेश २६७, भगत द्रोपती सोपान २६३, मिसाळ गोकुळाबाई ज्ञानेश्वर २६१, रुपनर आनंदीबाई रंगनाथ २६०,

Solapur News  : सहकारी संस्था मतदारसंघ –

उषा रवींद्र देशमुख तर कल्पना प्रकाश शिंगाडे या भटक्या जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग महिला मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्या आहेत.

अनुसूचित जाती जमाती महिला राखीव मतदार संघ-

बनसोडे रतन संभाजी ११४१ तर बनसोडे स्मिता किशोर ११५६ मताने निवडून आल्या आहेत.

इतर मागासवर्गीय महिला प्रतिनिधी मतदारसंघ –

राजश्री रामचंद्र जाधव या निवडून आल्या आहेत.

शेतकरी महिला सूतगिरणीच्या संचालकपदाच्या २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संस्था मतदारसंघातून व भटक्या विमुक्त मतदारसंघातून प्रत्येकी एक अर्ज आल्याने शेकापचे दोन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १९ जागांसाठी रविवारी (दि. ७) मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर आज (दि. ८) मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रकांत टीकुळे यांनी काम पाहिले. सर्व विजयी उमेदवारांचे डॉ. अनिकेत देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news