महावितरण गो ग्रीन योजनेत पुणे विभागात सोलापूर तिसरे

महावितरण गो ग्रीन योजनेत पुणे विभागात सोलापूर तिसरे
Published on
Updated on

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत सोलापूर जिल्ह्यातील 12 हजार 197 पर्यावरणस्नेही वीज ग्राहकांनी 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडला आहे. या वीज ग्राहकांनी 'गो ग्रीन' योजनेला प्रतिसाद दिल्याने त्यांची तब्बल 14 लाख 63 हजार 640 रुपयांची वार्षिक बचत होत आहे. गो ग्रीन योजनेत पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याला तिसरा क्रमांक मिळाला.

वीज बिल तयार झाल्यानंतर लगेच संगणकीय प्रणालीद्वारे ते 'गो ग्रीन'मधील 'ई-मेल'द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच 'एसएमएस'द्वारेही वीज बिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रॉम्प्ट पेमेंटसह ऑनलाईनद्वारे लगेचच बिल भरणा करता येईल.

'गो ग्रीन' योजनेत पुणे जिल्ह्यात एक लाख 23 हजार 396 ग्राहक सहभागी झाले, त्यांची 1 कोटी 48 लाख 7 हजार 520 रुपयांची वार्षिक बचत होत आहे.सातारा जिल्ह्यातील 11 हजार 525 ग्राहकांचे 13 लाख 83 हजार रुपये, सोलापूर जिल्ह्यातील 12 हजार 197 ग्राहकांचे 14 लाख 63 हजार 640 रुपये,कोल्हापूर जिल्ह्यातील 15 हजार 457 ग्राहकांचे 18 लाख 54 हजार 840 रुपये आणि सांगली जिल्ह्यातील 9 हजार 875 ग्राहकांच्या 11 लाख 85 हजार रुपयांची वीज बिलात वार्षिक बचत होत आहे.

वीज ग्राहकांनी 'गो ग्रीन' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाइल अ‍ॅप किंवा संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.
'गो ग्रीन' योजनेत सहभागी झालेल्या वीज ग्राहकांना छापील वीजि बलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीज बिलासह मागील 11 महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.

आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत 'गो- ग्रीन' योजना पर्यावरण रक्षणासाठी देखील महत्त्वाची आहे. कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाइल अ‍ॅप व वेबसाइटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीज बिल भरल्याचा पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे गो-ग्रीन योजनेत सर्व लघुदाब ग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.

प्रतिबिल दहा रुपयांची सवलत

महावितरणच्या 'गो ग्रीन' योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात दहा रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेतसहभागी ग्राहकांची वीज बिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news