सोलापूर : पाकणी येथील इंधन पुरवठा ठप्प! जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल | पुढारी

सोलापूर : पाकणी येथील इंधन पुरवठा ठप्प! जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

सोलापूर; पांडूरंग बेलभंडारे : पाकणी येथील इंधन पुरवठा करणा-या ऑईल डेपोला सोलापूर उपजिल्हाअधिकारी व पुरवठा आधिकारी यांनी भेट दिली. ऑईल पुरवठा करणा-या कंपन्या व इंधन वाहतूक करणा-या टँकरच्या सुरक्षेत वाढ करून मोठा फौजफाठा तैनात करण्याचे आदेश त्यांनी दिले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात इंधन वाहतूक सुरू आहे.

केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक नियमाचा निषेध करण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकणी येथील इंडियन ऑइल कार्पोरेशन लि., भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि., या ऑईल पुरवठा करणा-या टँकर चालक व मालकांनी बंद पुकारला होता. याचा परिणाम सोलापूरसह धाराशीव, बीड, नांदेड, जत येथील इंधन पुरवठयावर झाला होता. इंधन वितरीत करणा-या पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नसल्याचे बोर्ड लावण्यात आले होते. याची सोलापूर जिल्हाआधिकरी कुमार आशिर्वाद यांनी दखल घेतली.

सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हाअधिकारी शिंदे व पुरवठा आधिकारी यांनी आज सकाळी पाकणी येथील ऑईल पुरवठा करणा-या ऑईल डेपोला भेट दिली. ऑईल पुरवठा करणा-या कंपन्या व इंधन वाहतूक करणा-या टँकरच्या सुरक्षेत वाढ करून मोठा फौजफाठा तैनात करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तालुका पोलिस स्टेशनचे नामदेव शिंदे, डोंगरे, अक्कलकोटेचे डी वाय एस पी यामावार, देवकर, महिंद्रकर यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. इंधन पुरवठा हा अत्यावश्यक सेवेत येत असून इंधन वाहतूक करणारे टँकर ड्रायव्हर यांनी सर्व सामान्यांना वेठीस धरू नये व जे टँकरचालक संपात सहभागी होतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे पाकणी ऑईल डेपोमधून काही टँकर चालकांनी इंधन वाहतूक चालू केली आहे. तर काही टँकर चालक आपल्या संपाच्या मागणीवर ठाम आहेत.

Back to top button