सोलापूर : शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

सोलापूर : शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
Published on
Updated on

टेंभुर्णी; पुढारी वृत्तसेवा : टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीस ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. टेंभुर्णीत १८ ऑगस्ट २०२२ रोजी आरोपीने हा अत्याचार केला होता. मात्र, पीडितेने याबाबतची माहिती २ ऑगस्ट २०२३ रोजी आपल्या आईला दिली. यानंतर आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, माढा तालुक्यातील एका गावात दहावीमध्ये शिक्षण घेत असून ती दररोज शाळेसाठी वस्तीवरील घरापासून दोन कि.मी. पायी चालत जाते. २ ऑगस्ट २०२३ रोजी शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी घरी रडत आली. तेव्हा आईने तिला विश्वासात घेऊन कारण विचारले असता तिने घटलेला सर्व प्रकार सांगितला. आरोपी शाळेत जाताना पाठलाग करत होता. शिवाय, त्याने तू मला खूप आवडतेस आपण पळून जाऊन लग्न करू, असे म्हणाला. पीडितेने नकार दिल्यानंतर भावाला आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केला.

पीडितेच्या आईने हा प्रकार पती, दीर यांना सांगितला असता ०२ ऑगस्ट २०२३ रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात येऊन पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीस तातडीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून त्यास पाच दिवसाची ८ ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news