कोल्हापूर : फळ विक्रीचा व्यवसाय सुरु केला म्हणून एकास मारहाण; गुन्हा दाखल | पुढारी

कोल्हापूर : फळ विक्रीचा व्यवसाय सुरु केला म्हणून एकास मारहाण; गुन्हा दाखल

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे फळ विक्रीचा व्यवसाय सुरु केल्याने पूर्वीपासून फळ व्यवसाय करत असलेल्या फळ व्यवसायाईकांनी त्या व्यावसायिकास मारहाण केली. या प्रकरणी शिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद जखमी अंकुश राजू मुतडकर याने दिली आहे. या प्रकारामुळे शिरोलीत काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पोलीस मिळालेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील फाट्यावर अंकुश राजू मुतडकर यांचा सम्राट पान शॉप आणि फळ विक्रीचा व्यवसाय आहे. मुतडकर याने सुरू केलेल्या फळांच्या व्यवसायामुळे परिसरातील अन्य फळ व्यावसायिकांच्या दुकानावर याचा परिणाम होऊ लागला. याचा राग मनात धरून निसार उर्फ समीर जमादार व दाऊद पटेल हे मुतडकर याच्या पानपट्टीत येऊन सिगारेट घेतली. यानंतर त्याला ब्रिज खाली कोणत्या तरी महिलेचा अपघात झाला चल बघूयात, असे खोटे सांगून त्याला जमादार आणि पटेल यांच्यासह अन्य आठ ते दहा युवकांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाण तो गंभीर जखमी झाला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button