Hingoli Crime News: पप्पू चव्हाण गोळीबार; आरोपींची माहिती देणार्‍यास २५ हजारांचे बक्षीस | पुढारी

Hingoli Crime News: पप्पू चव्हाण गोळीबार; आरोपींची माहिती देणार्‍यास २५ हजारांचे बक्षीस

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : भाजपा युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण गोळीबार प्रकरणात फरार आरोपींची माहिती देणार्‍यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये भाजपा युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यांच्यावर तातडीने हिंगोलीच्या खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले आहे. आता त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय इंदोरीया व ओम पवार अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले आहे. पोलिसांकडून त्यांचा ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे. मात्र, अद्यापही त्यांची माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. पोलिसांनी संभाव्य ठिकाणी छापे टाकून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची माहिती मिळाली नाही. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी अक्षय इंदोरिया व ओम पवार यांची माहिती देणार्‍यास पोलिसांनी २५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.

हेही वाचा 

Back to top button