सोलापूर : बाळे परिसरातील चौघे गुन्हेगार तडीपार

सोलापूर : बाळे परिसरातील चौघे गुन्हेगार तडीपार www.pudharinews.
सोलापूर : बाळे परिसरातील चौघे गुन्हेगार तडीपार www.pudharinews.
Published on
Updated on

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहरांमध्ये संघटितरीत्या टोळी प्रस्थापित करून टोळीच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या बाळे येथील चौघांना सोलापूर, पुणे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले आहे. सौदागर शहाजी शिरसागर (वय ३३ राहणार समर्थ नगर बाळे) सोमनाथ हनुमंत सर्वगोड (वय २७ राहणार भीम नगर बाळे) विलास रमेश कवडे  (३५ राहणार मारुती गल्ली बाळे) सागर कल्लप्पा तोडकरी (वय ३४ राहणार वाणी गल्ली बाळे) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

डॉक्टरांवर तसेच हॉस्पिटल वर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून या चौघांवर जमून दंगा करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, हॉस्पिटलमध्ये दंगा करून तोडफोड करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसावा म्हणून पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी त्यांना तडीपार करण्याचे आदेश दिलेले आहेत.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news