त्याने माझ्या गुप्तांगात दारूची बाटली घातली; अभिनेत्रीचा पतीवर भर न्यायालयात गंभीर आरोप | पुढारी

त्याने माझ्या गुप्तांगात दारूची बाटली घातली; अभिनेत्रीचा पतीवर भर न्यायालयात गंभीर आरोप

न्यूयॉर्क; पुढारी ऑनलाईन : हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता जॉनी डेप (johnny depp) आणि त्याची पुर्वीची पत्नी अभिनेत्री अंबर हर्ट (amber heard) यांचा वाद अत्यंत विकोपाला गेला आहे. यांचा हा वाद कोर्टात पोहचला असून आता कोर्टामध्ये ते दोघे एकमेकांवर अनेक आरोप करत आहेत. त्यांनी कोर्टात एकमेकांवर केलेले आरोप ऐकून त्यांचे चाहते मात्र सुन्न झाले आहेत. अंबर हिने जॉनीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. तर जॉनीने अंबरवर अब्रुनुकसानीचा घटला दाखल केला आहे. सध्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु असून अंबर हर्ट हिच्या वकीलांनी जॉनी डेपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. वर्जिनिया येथील फेअरफॅक्स काउंटी कोर्टहाऊसमध्ये हा घटला सुरू आहे.

एका प्रसिद्ध मॅगझीनच्या वृत्तानुसार अंबर हर्टने जॉनीवर घरगुती हिंसाचाराचा घटला दाखल केला आहे. जॉनी (johnny depp) आणि अंबर हे २०१६ मध्ये विभक्त झाले होते. जॉनीने दाखल केलेल्या मानहानी घटल्याची सुनावणी सुरु असून यावेळी न्यायालयात अंबरने वकीलांच्या मार्फत जॉनीवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी अंबरने तिच्यावर झालेल्या कौटुंबिक हिंसाचारा बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच जॉनीने आपल्यासोबत घृणास्पद व किळसवाण्या वर्तनासह लैगिंक व मानसिक शोषण केला असल्याचा आरोप अंबरने केला आहे.

अंबरचा आरोप- डेपने गुप्तांगात दारूची बाटली घातली (johnny depp)

अंबरच्या वकीलांनी अंबरवरतील करण्यात आलेल्या अत्याचाराबाबतचे पुरावे कोर्टासमोर सादर केले आहेत. तसेच वकीलांनी अबंरचे शारीरिक, मानसिक व भावनिक शोषण झाल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. अंबर सोबत जॉनी डेप  (johnny depp) हा अत्यंत विकृतपणे वागत असल्याचा आरोप वकीलांनी केला आहे. जॉनी दारुच्या नशेत राक्षसीप्रवृत्तीने अंबरचे लैगिंक शोषण करायचा. वकीलांनी कोर्टासमोर सांगितले की, जॉनीने दारुच्या नशेत अंबरचा नाईट गाऊन फाडला व यानंतर त्याने तिच्या गुप्तांगात दारुची बाटली घातल्याचा आरोप केला. जॉनी हा दारुच्या नशेत अत्यंत विकृतपणे अंबरचे शारीरिक शोषण करायचा.

अंबर हर्ट हिने तिच्यावर झालेल्या कौटुंबिक हिंसाचारावर एक लेख देखिल लिहला होता. या सर्व गंभीर आरोपांवर जॉनी डेप म्हणाला, माझी प्रतिमा डागाळण्यासाठी तिने असा प्रकार केला आहे. जॉनीचे हे आरोप अंबरने फेटाळले होते. मात्र एका मुलाखतीमध्ये तिने हे कबुल केले की, मी देखिल अनेक वस्तू फेकून जॉनीला मारायचे. जॉनी डेपने देखिल त्याला गंभीरित्या मारण्यात आल्याचे फोटो सोशल माध्यमांवर शेअर केले होते.

Back to top button