सोलापूर : बाप-लेकाने मिळून केली बांधकाम व्यावसायिकाची २९ लाखांची फसवणूक

सोलापूर : बाप-लेकाने मिळून केली बांधकाम व्यावसायिकाची २९ लाखांची फसवणूक

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : बाप-लेकाने मिळून एका बांधकाम व्यवसायकाची २९ लाख ८३ हजार ८७७ रुपये इतकी रक्कम घेऊन परत न देता फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी सुरेंद्र चक्रपाणी चिलका (वय-५४,रा.आर्केड, रेल्वे लाइन्स, सोलापूर) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीवरून राहुल राजकुमार रेड्डी आणि राजकुमार रेड्डी (दोघे रा.साई कॉम्प्लेक्स ,पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा चुलत भाऊ प्रशांत चिलका यांचा मित्र राहुल रेड्डी यांची व फिर्यादी यांची बांधकाम व्यवसायामुळे मागील दहा वर्षापासून ओळख होती.

वरील संशयित आरोपी यांनी एच.एस.आर साईट सोलापूर या पाण्याच्या टाकीचे काम इंडियन ह्यूमन पाईप कंपनी लिमिटेड यांच्याकडून घेऊन त्यात फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादीस मानसिक त्रास देऊन विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गायकवाड हे करीत आहेत.

हेही वाचलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news