TV Watching : ‘इतका’ वेळ टीव्ही पाहताय? तर हार्ट अटॅकची शक्यता अधिक, वाचा सविस्तर | पुढारी

TV Watching : 'इतका' वेळ टीव्ही पाहताय? तर हार्ट अटॅकची शक्यता अधिक, वाचा सविस्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजच्या काळात मनोरंजनाची अनेक साधनं उपलब्ध झालेली असली तरी, पूर्वीपासून आजपर्यंत लोकप्रिय ठरलेलं मनोरंजनाचं साधन म्हणजे टीव्ही. पण, हा टीव्ही सतत पाहिला तर पाहणाऱ्याच्या हृदयावर थेट परिणाम करू शकतो. एका नव्या अभ्यासानुसार सातत्याने टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे कोरोनरी हृदयरोगाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. (TV Watching)

संशोधकांनी युके बायोबॅंककडून माहिती गोळा केल्यानंतर चिकित्सक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार टीव्ही पाहणे किंवा विश्रांतीसाठी संगणकाचा वापर करणं कोरोनरी हृदयरोगाचा धोका सर्वाधिक आहे. केंब्रिज विद्यापीठ आणि हाँगकाँग विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या पथकाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, दररोज एका तासापेक्षा कमी वेळ टीव्ही पाहिला तर हृदयरोगाच्या धोका ११ टक्क्याने कमी होतो. (TV Watching)

संशोधनात असे दिसून आले की, जे लोक ४ तासांहून अधिक टीव्ही पाहतात त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा धोका सर्वात जास्त असतो. जे लोक ३ तासांपेक्षा कमी टीव्ही पाहतात त्यांचा हृदयरोग ६ टक्क्यांनी कमी होतो, तर जे लोक १ तासापेक्षा कमी टीव्ही पाहतात त्यांचा हृदयरोग १६ टक्क्यांनी कमी होतो, असे संशोधनात आढळून आलेले आहे. या अभ्यासासाठी संशोधकांनी सुमारे ५ लाखांहून अधिक लोकांच्या पॉलिजेनिक जोखीम स्कोअर गोळा केले होते. खूप वेळ एका ठिकाणी कोणतीही हालचाल न करता बसून राहण्याने हृदयरोग वाढतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरातील माऊली रथ नेते गरजूंपर्यंत जेवण

Back to top button