Adivasi Dhangar Sahitya Sammelan: आदिवासी धनगर साहित्य संमेलन; येळकोट येळकोट…च्या जयघोषात ग्रंथदिंडी

Adivasi Dhangar Sahitya Sammelan: आदिवासी धनगर साहित्य संमेलन; येळकोट येळकोट…च्या जयघोषात ग्रंथदिंडी
Published on
Updated on

सोलापूर: पुढारी वृत्तसेवा : हलग्यांचा कडकडाट, ढोल ताशा आणि तुतारीच्या निनादात… येळकोट येळकोट जय मल्हार … बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करीत आज (दि.२४) सकाळी बेलाटी येथे आदिवासी धनगर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीतून आदिवासी धनगर संस्कृती व परंपरांचे दर्शन घडले. यावेळी गजनृत्य, झांज, टिपरी, गजढोल व लेझीम पथकांचे बहारदार खेळ सादर करण्यात आले. Adivasi Dhangar Sahitya Sammelan

श्री संत सद्गुरु बाळूमामा ट्रस्ट बेलाटी आयोजित पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन २४ व २५ फेब्रुवारीरोजी श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिर विजापूर बायपास हायवे बेलाटी येथे होत आहे. या निमित्ताने आज सकाळी बेलाटीचे श्रीराम पाटील यांच्या वाड्याजवळील श्री लक्ष्मी मंदिर येथून या ग्रंथदिंडीस मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. Adivasi Dhangar Sahitya Sammelan

माजी आ. दिलीप माने यांच्या हस्ते पूजन करून ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संमेलनाचे उद्घाटक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्र राज्य सोशल मीडियाचे राज्य अध्यक्ष राजा माने, संमेलन अध्यक्ष माजी आ. अॅड. रामहरी रुपनवर, संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले, स्वागत अध्यक्ष श्रीराम पाटील, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे, अमरजीत राजे बारगळ, कवी गोविंद काळे, माजी स्वागत अध्यक्ष प्राचार्य संजय शिंगाडे, साहित्यिक बापूसाहेब हाटकर, उपाध्यक्ष संभाजीराव सूळ, सिद्धारूढ बेडगनूर, अण्णाप्पा सतुबर, बाळासाहेब कर्णवर – पाटील, प्रा. कुंडलिक आलदर, बिसलसिद्ध काळे, शेखर बंगाळे, जगन्नाथ पैकेकरी आदीं मान्यवर उपस्थित होते.

दिंडीमध्ये पालखीसह टिपरी, लेझीम, झांज, गजढोल, गज नृत्य पथके सहभागी झाली होती. महिला व पुरुष गज नृत्य पथकाने बहारदार सादरीकरण केले. टिपरी, लेझीम गजढोल, झांज पथकांनी लक्ष वेधले. जेऊरच्या हलग्यांचा कडकडाट झाला. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस, असे खेळांचे विविध प्रकार सादर केले. हलग्यांच्या कडकडाटात, ढोल ताशा आणि तुतारीच्या निनादात येळकोट येळकोट जय मल्हार … बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण करीत मंगलमय वातावरणात दिंडी संमेलन स्थळी मार्गस्थ झाली.

Adivasi Dhangar Sahitya Sammelan : पालखीमध्ये गीता आणि होळकर शाहीतील पुस्तके

या पालखीमध्ये भगवत गीता आणि होळकर शाहीतील ऐतिहासिक पुस्तके, श्री संत सद्गुरु बाळूमामा यांची मूर्ती ठेवण्यात आली होती. येळकोट येळकोट जय मल्हार … बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष अशा उत्साही वातावरणात ही दिंडी काढण्यात आली.

या शिक्षण संस्थांचा होता सहभाग

या दिंडीमध्ये ज्ञानसंपदा प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, एम. एम. पटेल चॅरिटेबल ट्रस्ट कुंभारी, कमलाबेन पटेल बीएससी नर्सिंग परिचारिका महाविद्यालय कुंभारी, सांगली जिल्ह्यातील म्हसवड येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था यासह शहर जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. तसेच जेऊरचे हलगी पथक आवर्जून सहभागी झाले होते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news