Lok Sabha Election 2024 | सोलापूर : माढा लोकसभा मोहिते-पाटील लढविणारच | पुढारी

Lok Sabha Election 2024 | सोलापूर : माढा लोकसभा मोहिते-पाटील लढविणारच

अकलूज, पुढारी वृत्तसेवा : श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची पूर्वतयारी आहे. आपल्याला तिकीट मिळणारच. असे उमेदवारीबाबतचे स्पष्ट संकेत सहकार महर्षीं कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते -पाटील यांनी दिले आहेत.

माढा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा भाजपमध्ये असलेला तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. यावर भाजप काम निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. असे असले तरी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यानंतर जयसिंह मोहिते-पाटील यांनी इच्छूक असल्याचे सांगीतल्यानेे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. या कारखान्याच्या 21 पैकी 19 जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित दोन जागांसाठी निवडणूक लागली आहे. त्या उमेदवाराच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत जयसिंह मोहिते -पाटील यांनी माढा लोकसभेची निवडणूक उढविण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. मागील वर्षभरापासून भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली आहे. त्यांनी माढा मतदारसंघ पिंजून काढला आहे. खा. नाईक-निंबाळकर व मोहिते-पाटील यांच्यामध्ये विकासकामांवरुन मतभेद दिसून येत आहेत. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेते, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

Back to top button