मोहोळ : सफाई कामगार महिलेचा पेनूरच्या ग्रामसेवकाने केला विनयभंग

मोहोळ : सफाई कामगार महिलेचा पेनूरच्या ग्रामसेवकाने केला विनयभंग
Published on
Updated on

मोहोळ, पुढारी वृत्तसेवा :  सफाई कामगार महिलेला अश्लील भाषा वापरुन विनयभंग केल्या प्रकरणी पेनूरच्या ग्रामसेवका विरोधात सोमवार ७ फेब्रुवारी रोजी मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभाकर धोंडीबा निर्मळे (रा. सोलापूर) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. ३ फेब्रुवारी रोजी ग्रामसेवकाने सफाई कामगार महिलेचा विनयभंग केला होता. हि घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने उघडकीस आली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी अशी माहिती की, पिडीत महिला गेल्या दहा वर्षांपासून पेनुर ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत आहे. या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक पदाचा कार्यभार प्रभाकर धोंडीबा निर्मळे (रा.सोलापूर) यांच्याकडे आहे. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता पीडित महिला ग्रामपंचायत कार्यालयात साफसफाई करीत होती. यावेळी ग्रामसेवक निर्मळे याने पीडितेला आतील रुम मध्ये कामासाठी बोलावून, तिला मिठी मारून तिचा विनयभंग केला. तसेच तिला जातिवाचक शिवीगाळ करून कामावरून काढून टाकण्याची धमकी देखील दिली. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे सदर कामगार महिला खूप घाबरली होती. दरम्यान ही घटना ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे.

या प्रकरणी सदर पीडित महिलेने सोमवार ७ फेब्रुवारी रोजी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामसेवक प्रभाकर धोंडीबा निर्मळे याच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटना घडल्यापासून ग्रामसेवक निर्मळे ग्रामपंचायत कार्यालयाकडे फिरकला देखील नाही. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भारती हे करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने ग्रामसेवकाच्या अटकेची मागणी केली आहे.

हे ही वाचलं का 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news