अखेर मुख्यमंत्री योगींविरोधात समाजवादी पक्षाने आपला पत्‍ता खोलला !

अखेर मुख्यमंत्री योगींविरोधात समाजवादी पक्षाने आपला पत्‍ता खोलला !

लखनऊ ; पुढारी वृत्‍तसेवा : यूपी विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने आज (सोमवार) 24 उमेदवारांची नवी यादी जाहीर केली. सपाने मुख्यमंत्री योगींच्या विरोधातही उमेदवार दिला आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या विरोधात गोरखपूर नगरमधून सभावती शुक्ला यांना तिकीट देण्यात आले आहे. आझमगडच्या मुबारकपूर मतदारसंघातून अखिलेश यादव हे निवडणूक लढवणार आहेत. अखिलेश यादव हे सपाचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. यापूर्वी मुबारकपूरहून ते उतरले आहेत. सुरुवातीला सपा प्रमुख अखिलेश यादव मुबारकपूरमधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली होती.

सपाच्या नव्या यादीत तीन महिलांची नावे आहेत. सभावती शुक्ला यांच्याशिवाय सुषमा पटेल यांना जौनपूरच्या मडियाहू आणि नंदिता शुक्ला यांना गोंडाच्या मेहनौनमधून तिकीट देण्यात आले आहे. सुषमा नुकत्याच बसपातून सपामध्ये आल्या होत्या. वाराणसीच्या दोन जागांची घोषणा करण्यात आली आहे. वाराणसी दक्षिणमधून किशन दीक्षित आणि सेवापुरीमधून सुरेंद्र सिंग पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. किशन हा तरुण आणि नवीन चेहरा आहे. सुरेंद्र हे यापूर्वीही आमदार आणि मंत्री राहिले आहेत.

प्रतापगढच्या विश्वनाथ गंजमधून सौरभ सिंह, राणीगंजमधून आरके वर्मा यांना सपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अन्सार अहमद यांना अलाहाबादमधील फाफामाऊ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. गोंडाच्या तरबत गंजमधून रामभजन चौबे, मानकापूरमधून रमेशचंद्र गौतम, गौरामधून संजय कुमार, बस्तीच्या हरैया मतदारसंघातून त्र्यंबक पाठक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

यापूर्वी रविवारी भाजपने पूर्वांचलमधून ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामध्ये दोन आमदार वगळता जुण्या लोकांनाच तिकीट देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news