पंढरपूर: शिकाऊ कार चालकाच्या धडकेत बहीण-भाऊ जखमी
पंढरपूर: पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर येथील वाखरीतमध्ये एका शिकाऊ कारचालकाने दुचाकी वाहनास धडक दिली. या अपघातात बहिण, भाऊ जखमी झाले आहेत. या प्रकरणी श्रीनिवास मोटर ड्रायव्हिंग प्रशिक्षण स्कूलचे व्यवस्थापक व कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत बाळकृष्ण पवार यांच्या ओम श्रीनिवास मोटर ड्रायव्हिंग प्रशिक्षण स्कूलमध्ये अक्षत स्वप्निल फडे (रा. महावीर नगर) हे वाहन चालवण्यास शिकत आहेत. फडे यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. तरीही अवधूत नागनाथ तोडकरी हे अक्षत फडे यांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देत होते.
पंढरपूर-पुणे रोडवर जाणारे वाहन क्रमांक एम एच ११ एल ९०६६ ही गोसावी पेट्रोल पंपाच्या समोरून अचानक वळवून समोर येणा-या एम एच १३ डी एस ६४१६ या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील स्नेहल संतोष दराडे (वय २२) व सार्थक संतोष दराडे (वय १४) जखमी झाले. यानंतर संतोष दराडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी अक्षय फडे यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालवण्याची प्रशिक्षण देत असताना दुचाकीस धडक दिल्याप्रकरणी फडे व तोडकरी यांच्या विरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा