Pune Solapur Highway | पुणे-सोलापूर महामार्गावरील अतिक्रमण काढा; अन्यथा प्रशासनाकडून थेट कारवाईचा इशारा

मोहोळ शहरातील अमृततुल्य हॉटेल ते पोस्ट ऑफिस परिसरातील संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस
Solapur Pune Highway Traffic Jam
Solapur Pune Highway Traffic Jam Pudhari
Published on
Updated on

Mohol Encroachment Action

मोहोळ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५च्या हद्दीत करण्यात आलेल्या कथित अनधिकृत अतिक्रमणाविरोधात राष्ट्रीय महामार्ग विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे. मोहोळ शहरातील अमृततुल्य हॉटेल ते पोस्ट ऑफिस परिसरातील संबंधित अतिक्रमणधारकाला राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण (जमीन व वाहतूक) अधिनियम २००२ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली. अतिक्रमण तातडीने हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२६ ऑगस्ट २०२६ रोजी नोटीस

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने २६ ऑगस्ट २०२६ रोजी ही नोटीस बजावण्यात आली. राष्ट्रीय महामार्गालगतच्या मिळकतीधारकाने महामार्गाच्या हद्दीत अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. या अतिक्रमणामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Solapur Pune Highway Traffic Jam
Solapur News : चार रेल्वे स्थानकांना येणार नवा लुक

सात दिवसांत अतिक्रमण हटविण्याची सूचना

नोटीसमध्ये संबंधित अतिक्रमण राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत असल्याने ते तातडीने काढणे आवश्यक असल्याचे नमूद आहे. नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत अतिक्रमणधारकाने स्वतःहून अतिक्रमण हटवावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ते थेट हटविण्यात येईल. तसेच या कारवाईसाठी येणारा संपूर्ण खर्च संबंधित अतिक्रमणधारकाकडून वसूल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.

Solapur Pune Highway Traffic Jam
Solapur News : कारखान्यांच्या साखर विक्रीची होणार तपासणी

चेनज क्रमांक २१४+६८०, एलएचएसवर अतिक्रमण

नोटीसमध्ये अतिक्रमणाचे ठिकाण चेनज क्रमांक २१४+६८०, एलएचएस असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीची प्रत्यक्ष मोजणी केल्यानंतर अतिक्रमण नेमके किती क्षेत्रात आहे, याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

केवळ नोटीस नको, प्रत्यक्ष कारवाईची अपेक्षा

राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत अतिक्रमणे वाढल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे नोटीस बजावून केवळ कागदी कारवाई न करता संबंधित अतिक्रमण प्रत्यक्षात कधी हटविण्यात येणार, याकडे मोहोळकरांचे लक्ष लागले आहे.

Solapur Pune Highway Traffic Jam
Solapur Statue Vandalism | मोहोळ येथील अशोक स्तंभावरील गौतम बुद्धांच्या प्रतिमेची तोडफोड

महामार्ग विभागाची पुढील भूमिका महत्त्वाची

नोटीसमध्ये दिलेली सात दिवसांची मुदत संपल्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्यास राष्ट्रीय महामार्ग विभाग कोणती भूमिका घेतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाकडून थेट अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाते का आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जातो का, याकडेही नागरिकांचे लक्ष आहे.

पुणे-सोलापूर NH-65 हा मोहोळमार्गे जाणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असल्याने त्याच्या हद्दीतील अतिक्रमणांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

इतर अतिक्रमणांवरही कारवाई होणार?

एका अतिक्रमणाविरोधात नोटीस बजावण्यात आल्यानंतर महामार्गाच्या हद्दीत अन्य ठिकाणीही अशाच प्रकारची अतिक्रमणे असल्यास त्यांच्यावर कारवाई होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे संबंधित नोटीसीनंतरच्या कारवाईबरोबरच महामार्गालगतच्या इतर अतिक्रमणांबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news