Solapur Statue Vandalism | मोहोळ येथील अशोक स्तंभावरील गौतम बुद्धांच्या प्रतिमेची तोडफोड

संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे नियंत्रित सदस्य अॅड. आकाश कापुरे यांनी केली आहे
Gautam Buddha Statue Vandalism
Gautam Buddha Statue VandalismPudhari
Published on
Updated on

Gautam Buddha Statue Vandalism

मोहोळ : मोहोळ शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व २ च्या मैदानात असलेल्या ऐतिहासिक अशोक स्तंभावरील तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे नियंत्रित सदस्य अॅड. आकाश कापुरे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारीद्वारे केली आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात महापुरुषांच्या कार्याचा लौकिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी ब्रिटिशांनी या ठिकाणी अशोक स्तंभ उभारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. स्तंभाच्या पूर्वेकडील बाजूस तथागत गौतम बुद्ध, पश्चिमेकडे रविंद्र टागोर, दक्षिणेकडे महात्मा येशू, तर उत्तरेकडे कार्ल मार्क्स यांच्या प्रतिमा कोरण्यात आल्या असून, त्यांचा कार्यकाळही नमूद करण्यात आला आहे.

Gautam Buddha Statue Vandalism
Solapur News : सराईत गुन्‍हेगाराला केले जेरबंद

मात्र, काही दिवसांपूर्वी मोहोळ नगरपरिषदेने शाळेच्या आवारात जाऊन स्तंभावरील केवळ तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची जाणूनबुजून तोडफोड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोहोळ शहरासह जिल्ह्यातील आणि देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असून, अशा प्रकारामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी तसेच प्रचलित कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीच्या प्रती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग, मुंबई, जिल्हाधिकारी सोलापूर, उपविभागीय अधिकारी पंढरपूर, तहसीलदार मोहोळ आणि पोलीस निरीक्षक मोहोळ यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत.

Gautam Buddha Statue Vandalism
Solapur News : जिल्ह्यातील राष्‍ट्रीय महामार्ग होणार सेफ

दरम्यान, शाळेच्या आवारात जाऊन प्रतिमेची तोडफोड करण्यामागील नेमका उद्देश काय होता, याबाबतही चौकशीची मागणी होत आहे. या प्रकरणी संबंधित विभागांचे अधिकारी कोणती भूमिका घेतात आणि दोषींवर कोणती कारवाई केली जाते, याकडे मोहोळ शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news