Solapur News : चार रेल्वे स्थानकांना येणार नवा लुक

​सोलापूर, वाडी, कुर्डूवाडी व भाळवणीचा समावेश
Solapur Railway Station
Solapur Railway Station
Published on
Updated on

​सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत २२ कोटी ५० लाखांच्या विकासकामांची निविदा काढली आहे. यातून सोलापूर, वाडी, कुर्डूवाडी व भाळवणी स्थानकांचे दोन टप्प्यांत आधुनिकीकरण केले जाणार आहे. ​पहिल्या टप्प्यात ७. ५ कोटी खर्चून आकर्षक प्रवेशद्वार, पार्किंग, ड्रेनेज व लँडस्केपिंग केले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात ७. ६१ कोटींतून जुन्या इमारतींची दुरुस्ती व नूतनीकरण होणार आहे. ​

हायटेक सुविधा

वाडी, कुर्डूवाडी व भाळवणीत २.५४ कोटींतून विश्रामगृह होईल. काँक्रिट कचरा कुंड्यांसाठी २.६५ कोटींची तरतूद केली आहे. तसेच, सोलापूर व दुधनीतील कर्मचारी निवासस्थानांच्या देखभालीसाठी २ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

दिव्यांगांना विशेष सोय

अमृत भारत योजनेचा मुख्य उद्देश स्थानकांचे सिटी सेंटर व रूफ प्लाझामध्ये रूपांतर होणार आहे. जुन्या सुविधांचा विकास करतानाच दिव्यांग नागरिकांसाठी विशेष सोयी उपलब्ध करून दिल्या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news