सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार हा महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांच्यावतीने देण्यात येतो. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण साेहळा रविवारी २ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सोलापूर होणार आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते तर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथील कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे.
दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी दिली.
.हेही वाचा