सोलापूर : पाकणी- शिवणी सोसायटी निवडणुकीत दिलीप माने गटाची बाजी | पुढारी

सोलापूर : पाकणी- शिवणी सोसायटी निवडणुकीत दिलीप माने गटाची बाजी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : पाकणी- शिवणी विविध कार्यकारी सोसायटीवर दिलीप माने गटाने आपली सत्ता अबाधित राखली. एकूण नऊ जागांसाठी रविवारी (दि.२६) रोजी घेण्यात आलेल्या मतदानात सर्व जागा जिंकत माने गटाने सोसायटीवर बाजी मारली.

सकाळपासून मतदानाला सुरूवात होवून संध्याकाळी साडेपाचपर्यंत ६१७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण १३ सदस्य संख्या असलेल्या सोसायटीमध्ये ४ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. विरोधी गटाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहनिबंधक आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले.

निवडून आलेले उमेदवार

नागनाथ गुंड, लहू गुंड, महादेव विभूते, मधूकर शिंदे, अर्जून शिंदे, किशोर शिंदे, तुकाराम साखरे, विश्वभंर साठे, विजय कांबळे हे सदस्य निवडून आले. तर वंदना शिंदे, रेखा खांडेकर, धर्मराज ढेपे, विजय येलगुंडे हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीसाठी दिलीप माने गटाकडून सरपंच बालाजी येलगुंडे, ज्ञानोबा साखरे, सचिन ढेपे, सुनिल शिंदे, रवि शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा : 

Back to top button