सोलापूरची लज्जतदार मटण सीक कबाब, सीक कढई लईभारी

सोलापूरची लज्जतदार मटण सीक कबाब, सीक कढई लईभारी
Published on
Updated on

सोलापूर: अंबादास पोळ : शहरवासियांची प्रसिद्ध डिश म्हणजे मटन सीक कबाब आणि सीक कढई. मटण खाण्याचे शौकीन लोकांना त्याची चव नक्कीच कायम आठवणीत राहणारी आहे. गेल्या १०० वर्षापासूनची ही सोलापूरी सीक कबाब आणि सीक कढई महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यातही प्रसिद्ध आहे.

देशभरात ख्याती असलेल्या मटन सीक कबाब आणि कढईची सिनेस्टार, दिग्गज राजकीय नेतेमंडळी, उद्योजक, खेळाडूंपासून अनेकांनी याची चव चाखली आहे. कोळशाच्या चुलीवर तयार करण्यात येणारा सीक कबाब आणि कढई एकदा जो कोणी खाईल तो चवीचे कौतुक करताना थकणार नाही.

सुमारे १०० हून अधिक काळापासून सोलापूरात मांसाहार प्रेमीची खाद्यसेवा देणारे काही कुटुंबातील तिसर्‍या पिढ्या पेंटर चौकात कार्यरत आहेत. सीक कबाब व सीक कढई तयार करुन घेण्यासाठी मटण बाहेरुन आणून द्यावे लागते. खास मटण खाण्यासाठीच खवय्ये कर्नाटक आंध्रप्रदेशमधून या ठिकाणी येतात. रविवारी खव्वयांची जास्त गर्दी होते. श्रावण महिना वगळता उर्वरित महिने सर्व धर्मातील व जातीमधील मांसाहार शौकिनांचा ओघ अवितरपणे सुरू असतो.

लज्जतदार चवीसाठी विशिष्ट प्रकारच्या मसाल्यांचा वापर

विशिष्ट प्रकारचा मसाला मटणाला लावण्यात येतो. त्यामध्ये पपई, आले, लसूण, सुके खोबरे, तीळ, खसखस, काजू कनी, मगजे, वाळवलेल्या कांद्यांची पेस्ट, गरम मसाला, दालचिनी, लवंग, धोंडफुल, जायफळ, इलायची, रामपत्री, शाहजिरा, काळी मिरी व भाजलेले धने इत्यादी जिन्नसांचा समावेश असतो. त्या

अनेक दिग्गजांनी चाखली चव

सोलापूर येथील सीक कबाब, सीक कढईची चव चाकण्यासाठी अनेक दिग्गज या ठिकाणी हजेरी लावले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंत चव्हाण, अजित पवार, आमदार प्रणिती शिंदे, सिने अभिनेते स्वर्गीय राज कपूर, राजेंद्र कुमार, संगीत क्षेत्रातील दिग्गज जोडी शंकर – जयकिशन, लता मंगेशकर आदीसह इतर क्षेत्रातील दिग्गज, मान्यवरांनी या डिशची चव चाखली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news