Dr. Smita Jadhav|डॉ. स्मिता जाधव यांचा सोलापुरात झंझावाती प्रचार दौरा

विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या घेतल्या भेटी : पदवीधर मतदारांशी साधला थेट संवाद
Dr. Smita Jadhav
सोलापूर : महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतले.Pudhari photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याला बुधवारी (दि. २१) सोलापुरात उदंड प्रतिसाद मिळाला. धार्मिक स्थळांचे दर्शन, विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या गाठीभेटी आणि पदवीधर मतदारांशी थेट संवाद साथत त्यांनी प्रचार केला.

प्रारंभी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या मंदिरात नतमस्तक होऊन डॉ. जाधव यांनी प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. आ. सुभाष देशमुख, सोलापूर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने, श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, वालचंद शिक्षण समूहाचे डॉ. रणजित गांधी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटी डॉ. स्मिता जाधव यांनी घेतल्या.

मित्रपक्षांची भक्कम साथ

भाजप महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देत आमच्या पक्षाची तुम्हाला भक्कम साथ असल्याचे सांगितले. यावेळी शहराध्यक्ष पवार यांनी उमेदवार डॉ. जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अजित बनसोडे यांची उपस्थिती होती.

काशीपीठ जगद्‌गुरूंचे शुभाशीर्वाद अक्कलकोट रस्त्यावरील बृहन्मठ होटगी मठास उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी भेट दिली. मठात काशीपिठाचे जगद्‌गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामींचे दर्शन घेतले. यावेळी 'यशस्वी भवः' असा आशीर्वाद महास्वामींनी उमेदवार डॉ. जाधव यांना दिला. महास्वामींनी विजयासाठी शुभाशीर्वाद देत चांगले काम करण्याचे आवाहन केले.

आ. सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा

महायुतीच्या उमेदवार डॉ. जाधव यांनी दक्षिण सोलापूरचे आ. सुभाष देशमुख यांच्या

कार्यालयात भेट घेतली. पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन, बूथनिहाय तयारी आणि मतदानाच्या दिवशी करावयाच्या व्यवस्थेबाबत यावेळी आ. देशमुख आणि उमेदवार डॉ. जाधव यांच्यात चर्चा झाली. यावेळी सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांनी पदवीधर मतदार नोंदणीसंदर्भातील माहिती दिली. मंडल अध्यक्ष अर्जुन जाधव आणि महेश देवकर उपस्थित होते.

धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी भेट

उमेदवार डॉ. जाधव यांनी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुष्कराज काडादी, तेजश्री काडादी, प्राचार्य गजानन धरणे, गिरीश बुगडे, संजय मंठाळे, शांतय्या स्वामी, संजय कुलकर्णी, डॉ. शैलेश पाटील आणि अमोल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पद्मशाली शिक्षण संस्थेस भेट

डॉ. स्मिता जाधव यांनी प्रचारदौऱ्यादरम्यान पद्मशाली शिक्षण संस्थेस भेट दिली. याप्रसंगी संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी डॉ. जाधव यांचा पुष्पगुच्छ देत गौरव केला. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्याल आणि अनिल निंबाळकर यांची उपस्थिती होती.

या दौऱ्यात भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, नगरसेविका वृषाली चालुक्य, भाजपा पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ. शैलेश पाटील, भाजप शहर उपाध्यक्षा साधना संगवे, डॉ. अमोल पाटील, उमेश कोळेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : डॉ. स्मिता जाधव

सोलापूर : शिक्षण क्षेत्रात २५ वर्षे काम करण्याचा मला अनुभव आहे. पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे. मतदारसंघातील ५८ तालुक्यांमधील पदवीधरांचा कौशल्य विकास, रोजगारवाढीसाठी, उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक आणि करिअर कॅम्पस उभारणीवर भर देणार आहे. पदवीधर तरुणींसाठी लेडीज हॉस्टेल आणि घरातून ग्राफिक डिझाईनसारखी कामे करू इच्छिणाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी सांगितले.

Dr. Smita Jadhav
पुणे पदवीधर निवडणूक : एस. व्ही. पाटील यांचा डॉ. स्मिता जाधव यांना जाहीर पाठिंबा

डॉ. जाधव यांनी दयानंद कॉलेज आणि श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकमध्ये पद‌वीधर व शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थित पदवीधरांसमोर आपले व्हिजन मांडले. शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या वतीने त्यांचे वडील मुरलीधर गावडे उपस्थित होते. उमेद्वार डॉ. जाधव म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे.

पदवीधरांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी २४ तास उपलब्ध राहून, समस्या सुटेपर्यंत पाठपुरावा करणार असून, दर तीन महिन्याला आपण केलेली कामे डिजिटलच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवणार आहे. याप्रसंगी मुरलीधर गावडे यांनी, "उमेदवार कौस्तुभ गावडे हे युवा उमेदवार आहेत. तसेच त्यांना शिक्षकांच्या प्रश्नाची जाण आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कौस्तुभ गावडे व पदवीधरांसाठी डॉ. स्मिता जाधव यांना पहिल्या पसंतीची मते द्यावी," असे आवाहन केले.

Dr. Smita Jadhav
kolhapur | डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य देणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news